बॉलिवूडमधील अभिनेत्री रेखा या आपल्या काळातील कलाकारांमध्ये कायम उजव्या राहील्या. आजच्या तरुण अभिनेत्रींना देखील रेखा यांच्या सौंदर्याने मागे टाकलं आहे. रेखा यांच्या अभिनयासोबतच त्यांचं खासगी आयुष्य देखील खुली किताब आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर रेखा यांनी अतोनात प्रेम केलं. एकतर्फी अशा या प्रेमाचा उल्लेख त्यांनी सिमी गरीवाल यांच्या मुलाखतीत अतिशय हळुवारपणे आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
रेखा यांचा 10 ऑक्टोबर रोजी वाढदिवस. रेखा यांचं फक्त नावंच पुरेसं आहे. रेखा सारखं या इंडस्ट्रीत कुणीच नाही. मग ती नजर असो वा आवाज, नजाकत आणि रेखांच्या अदा... अगदी केसांपासून अगदी पायापर्यंत एकदम सिल्क आणि बनारसी साडीतील रेखा प्रत्येकाचं लक्ष वेधते.
रेखा यांनी आपल्या खासगी आयुष्यात अनेक गोष्टी सहन केल्या. त्यांचं नाव अमिताभ बच्चन, विनोद मेहरा यांच्यासोबत जोडलं गेलं. एवढंच नव्हे तर लग्नातही त्यांना यश आलं नाही. असं असताना रेखा यांचं नाव एका महिलेसोबत जोडलं गेलं. त्यांच्या कुटुंबियांनी असा दावा केली की, रेखा यांचं पर्सनल सेक्रेटरी फरजाना यांच्यासोबत नाव जोडलं गेलं. दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1950 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे लहानपणीचे नाव भानुरेखा असे होते. रेखा यांचे आईवडील जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली होते. दोघेही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. जेव्हा तिच्या कुटुंबात आर्थिक अडचणी वाढल्या तेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीत कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या 16 व्या वर्षी रेखा यांनी "रंगुला रतलाम" या तमिळ चित्रपटात काम केले आणि नंतर कन्नड चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. 1969 मध्ये रेखा यांनी "अंजना सफर" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि विश्वजीत चॅटर्जीसोबतच्या तिच्या पाच मिनिटांच्या जबरदस्तीच्या चुंबन दृश्याने प्रसिद्धी मिळवली.
रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त होते. मुकेश अग्रवाल गेल्यानंतर रेखा त्यांच्या वैयक्तिक सचिव फरजानासोबत राहू लागली. फरजाना रेखा यांची सावली बनली. रेखा आणि फरजाना यांची भेट "सिलसिला" चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यावेळी फरजाना रेखा यांच्या मेकअप टीमचा भाग होती. तिथून त्यांची भेट जवळच्या मैत्रीत बदलली. अभिनेत्रीने तिला तिची सचिव म्हणून नियुक्त केले. फरजाना रेखा यांच्यासोबत 1986 पासूनआहे. रेखा यांच्या आयुष्यात फरजानाचे महत्त्व इतके वाढले होते की तिच्या परवानगीशिवाय कोणीही रेखा यांना भेटू शकत नव्हते. फरजाना बहुतेकदा औपचारिक शैलीत दिसते. तिचे केस लहान आहेत.. रेखा प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक पार्टीत आणि अगदी संसद संकुलातही फरजानासोबतच दिसतात.
रेखा यांची जाव आणि मुकेश अग्रवाल यांची वहिनी एकदा फरजाना आणि रेखा यांच्या नात्याबद्दल मोठे विधान केले होते. त्यांच्या मते, "रेखा आणि फरजानामध्ये काहीतरी विचित्र चालू होते. मैत्री करणे किंवा बहिणी असणे खूप वेगळे आहे, परंतु रेखा आणि फरजानाचे वर्तन असे नव्हते. रेखा आणि फरजाना यांचे नाते पती-पत्नीसारखे होते. मी ते सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिले." इतकेच नाही तर रेखा यांच्या जावेने असेही म्हटले आहे की जर रेखा मुकेशला भेटली नसती तर मुकेश आज जिवंत असता. अशा अफवांवर रेखा म्हणाल्या की आमच्याबद्दल जे काही पसरवले जात आहे ते चुकीच्या विचारशैलीचे उत्तर आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.