'हे' कारण देत रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार

रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर...

Updated: Jul 14, 2020, 09:33 PM IST
'हे' कारण देत रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार
संग्रहित फोटो

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी कोरोनाची चाचणी घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. तसंच बीएमसीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरात प्रवेश करण्यासही नकार दिल्याचं बोलंल जात आहे. बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी अभिनेत्री आणि इतर कर्मचार्‍यांसह सर्व सदस्यांची चाचणी करण्याबाबत सांगितलं. परंतु रेखा यांनी चाचणीसाठी नकार दिल्याची माहिती मिळत आहे.

रिपोर्टनुसार, बीएमसीची टीम रेखा यांच्या घरातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी पोहचली होती, पंरतु रेखा यांच्या मॅनेजरने त्यांना आपला नंबर देऊन नंतर बोलण्याबाबत सांगितलं. त्यामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांना गेटवरुनच परतावं लागलं. त्यांना घर सॅनिटाईज करण्याचीही परवानगी देण्यात आली नाही. बीएमसी कर्मचाऱ्यांना रेखा यांच्या घराबाहेर सॅनिटाईज करुन परतावं लागलं.

पालिका अधिकाऱ्यांनी फरजाना यांना फोन केला असता त्यांनी रेखा यांची तब्येत बरी आहे. त्या कोणाच्याही संपर्कात आल्या नसल्याचं, त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर रेखा यांचा बंगला सील करण्यात आला आहे.

सुशांतच्या निधनाला महिना उलटताच प्रेयसी रिया चक्रवर्तीनं लिहिली भावनिक पोस्ट

दरम्यान, अमिताभ बच्चन यांना कोरोना लागण झाल्याने त्यांना नानानटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिग बींनंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर अभिनेत्री सारा अली खाननेही तिचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. त्याआधी बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या एका नोकरालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

सारा अली खानच्या चालकाला कोरोनाची लागण