'हम आपके है कौन'मधील आईचा तो सीन पाहून भडकलेला रेणुका शहाणेंचा मोठा मुलगा, म्हणाला- 'मी त्या दिग्दर्शकाला मारेन'

Bollywood Actress:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलांनी जेव्हा तिचा चित्रपट पाहिला तेव्हा मोठा मुलगा दिग्दर्शकावर संतापला. काय म्हणाला होता मुलगा?    

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 7, 2025, 11:39 AM IST
'हम आपके है कौन'मधील आईचा तो सीन पाहून भडकलेला रेणुका शहाणेंचा मोठा मुलगा, म्हणाला- 'मी त्या दिग्दर्शकाला मारेन'

Bollywood Actress: बॉलिवूडच्या 90 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय आणि हिट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘हम आपके है कौन’. या चित्रपटात माधुरी दीक्षित, सलमान खान आणि रेणुका शहाणे यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त छाप सोडली होती. कुटुंबातील नात्यांचं भावनिक चित्रण आणि गोड गाणी यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. मात्र, इतका गाजलेला हा चित्रपट रेणुका शहाणेंच्या मुलांनी बराच काळ पाहिलाच नव्हता.

Add Zee News as a Preferred Source

अलीकडेच एका यूट्यूब वाहिनीशी संवाद साधताना रेणुका शहाणेंनी या चित्रपटाशी निगडित एक मजेशीर पण भावनिक किस्सा शेअर केला आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलांनी ‘हम आपके है कौन’ पाहिला नव्हता. कारण त्यांना त्यांच्या आईचं अभिनेत्री असणं खूप उशिरा कळलं.

'माझी आई अभिनेत्री नाही, आई आहे'

रेणुका शहाणे म्हणाल्या, 'माझी मुलं लहान असताना त्यांच्या शाळेत मित्र म्हणायचे की, ‘तुझी आई अभिनेत्री आहे’. पण माझी मुलं ठामपणे म्हणायची, ‘नाही, माझी आई अभिनेत्री नाही. माझे बाबा अभिनेते आहेत. माझी आई म्हणजे फक्त माझी आई आहे.'

त्या पुढे म्हणाल्या, 'त्यांना मी अभिनेत्री आहे हे खूप उशिरा समजलं. तेव्हा मीही त्यांना काही सांगितलं नाही की मी अभिनेत्री आहे. नंतर एकदा त्यांनी विचारलं की, ‘तू ‘हम आपके है कौन’ नावाचा चित्रपट केला आहेस का?’ मी म्हटलं, होय. मग त्यांना तो चित्रपट दाखवला'.

चित्रपट पाहून मुलांची प्रतिक्रिया

रेणुका शहाणेंनी सांगितलं, 'चित्रपट पाहताना मुलं म्हणाली, ‘यात तू काहीतरी वेगळीच दिसतेस. आम्हाला हा चित्रपट बघायची इच्छा नाही.’ त्यामुळे त्यांनी तेव्हा तो पूर्ण चित्रपट बघितलाच नाही.' ‘हम आपके है कौन’मध्ये रेणुकांनी आदर्श सुनेची भूमिका साकारली होती. पण पुढे चित्रपटात जिन्यावरून पाय घसरून त्यांचा मृत्यू होतो. हा सीन पाहून रेणुकांच्या मोठ्या मुलाचं मन अक्षरशः दुखावलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'या दिग्दर्शकाला मी भेटलो तर मारेन'

रेणुका शहाणे म्हणाल्या, 'नंतर मुलं थोडी मोठी झाली तेव्हा त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांना चिडवलं. ‘तुम्ही ‘हम आपके है कौन’ पाहिला नाहीये? तुम्हाला त्यातली गाणीही माहीत नाहीत? मग मुलांनी तो चित्रपट पाहिला आणि जेव्हा त्यांनी माझा मृत्यूचा सीन पाहिला तेव्हा माझा मोठा मुलगा रागावून म्हणाला, ‘या दिग्दर्शकाला मी भेटलो तर मी त्याला मारेन. त्याने माझ्या आईला का मारलं?' हा किस्सा सांगताना रेणुका शहाणे स्वतःही मनसोक्त हसल्या.

FAQ

‘हम आपके है कौन’ चित्रपट कधी आणि कोणत्या भूमिकेत रेणुका शहाणे दिसल्या?

‘हम आपके है कौन’ हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला. रेणुका शहाणे यांनी त्यात आदर्श सुनेची भूमिका साकारली, ज्यात त्या कुटुंबातील भावनिक आधार देणाऱ्या व्यक्तिरेखेत दिसल्या.

रेणुका शहाणे यांच्या मुलांना आई अभिनेत्री असल्याचे कधी समजले?

रेणुका शहाणे यांच्या मुलांना आई अभिनेत्री असल्याचे खूप उशिरा समजले. शाळेत मित्र म्हणायचे की, ‘तुझी आई अभिनेत्री आहे’, पण मुलं म्हणायची, ‘नाही, ती फक्त आई आहे. बाबा अभिनेते आहेत.’

मुलांनी ‘हम आपके है कौन’ पाहण्यास का नकार दिला?

मुलांनी चित्रपट पाहण्यास नकार दिला कारण त्यांना आई वेगळी दिसत होती. त्यांनी म्हटले, ‘यात तू काहीतरी वेगळी दिसतेस. आम्हाला हा चित्रपट बघायची इच्छा नाही.’

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More