SSR Suicide : मोठा खुलासा! रिया चक्रवर्तीचा मुंबईत फ्लॅट; याचे पैसे कुठून आले?

प्रकरणाला वेगळं वळण

Updated: Aug 7, 2020, 10:41 AM IST
SSR Suicide : मोठा खुलासा! रिया चक्रवर्तीचा मुंबईत फ्लॅट; याचे पैसे कुठून आले?

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. ज्यामध्ये रिया चक्रवर्तीशी निगडीत मोठी गोष्टी समोर आली आहे रिया चक्रवर्तीने मुंबईत फ्लॅट खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. या फ्लॅटची किंमत ७६ लाख रुपये आहे. हा फ्लॅट रिया चक्रवर्तीच्या नावावर रजिस्टर्ड असल्याची माहिती मिळाली आहे. 

रिया चक्रवर्तीने २८ मे २०१८ रोजी फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट मुंबईतील खार पूर्व परिसरात आहे. याच्या रजिस्टड ड्यूटीकरता ३ लाख ८० हजार रक्कम भरली आहे. हा फ्लॅट ३५४ स्केवर फूट असून खार पूर्वेच्या गुलमोहर एवेन्यूमधील चौथ्या मजल्यावर आहे. या फ्लॅट संदर्भात आता रिया चक्रवर्तीची चौकशी होणार आहे. 

गुरूवारी सुशांत प्रकरणात रियासह ६ लोकांवर सीबीआयने केस दाखल केली असून चौकशी सुरू केली आहे. या केसमध्ये रियासह तिचे कुटुंबिय आणि सुशांतचा बिझनेस मॅनेजरचा समावेश आहे.त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुशांत सिंहच्या वडिलांनी के के सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे. या आधारावर ईडी (Enforcement Directorate) रियाची चौकशी करणार आहे. ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यातून काढलेल्या पैशांची चौकशी करणार आहे. 

बिहारमधील पाटण्याचे एसपी विनय तिवार यांचे मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन समाप्त केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आलेले विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केले होते. ते बिहारहून मुंबईला आले होते.

 सर्वोच्च न्यायालयाने विनय तिवारीला क्वारंटाईन ठेवण्याबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज त्यांची क्वारंटाईन रद्द करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आदेशानुसार एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्याताना महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्य सरकारने दिलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही, म्हणूनच त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले, असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.