Rishi Kapoor Death Anniversary 2023: दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor News) यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे. यानिमित्तानं त्यांचे चाहते हे त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. नीतू कपूर यांनीही त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेते ऋषी कपूर हे जितके स्मितभाषी, प्रेमळ आणि कर्तबगार अभिनेते होते तितकेच ते त्यांच्या रोखठोक आणि अग्रेसिव्ह स्वभावासाठीही ओळखले जात होते. त्यांचे ट्विट्सही कायमच वादग्रस्त राहिले आहेत. आपल्या अखेरच्या आयुष्यातही त्यांनी अनेक चांगले चित्रपट केले. बॉबीपासून सुरूवात करत (Rishi Kapoor Autobiography) त्यांनी हळूहळू यशाचे शिखर गाठले. कपूर घराण्यातून असल्यानं त्यांच्यावरही तेवढीच मोठी जबाबदारी होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषी कपूर यांचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. त्यातील असाच एक किस्सा (Rishi Kapoor buying an Award) अनेकदा चर्चिला गेला आहे. तो म्हणजे ऋषी कपूर यांनी स्वत:हून या गोष्टीची कबूली दिली होती की, त्यांनी बॉबी चित्रपटातील आपल्या भुमिकेसाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळावा म्हणून तो 30 हजार रूपयांना विकत घेतला होता. त्याचवेळी अमिताभ बच्चन यांचा जंजीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा खुलासा त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात खुल्लम खुल्लामधून केला होता. 1970 च्या दशका बॉलिवूडमध्ये तरूण उमदं व्यक्तिमत्त्व आलं ते म्हणजे ऋषी कपूर यांच्या रूपानं. त्यावेळी स्टार कीड्स असा फंडा इतका रूजला नव्हता. 


परंतु राज कपूर यांचे चिरंजीव यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे अशा बातमी सगळीकडे पसरली होती. त्यानंतर ऋषी कपूर हे त्या काळातील सर्वांचे आवडते असे देखणे चॉकलेट बॉय झाले होते. त्यावेळी अमिताभ बच्चनही मोठे सुपरस्टार होते आणि त्यासोबतच राजेश खन्नासुद्धा. यांच्या स्पर्धेत ऋषी कपूर यांनी आपलं असं वेगळं स्थान निर्माण केले होते. त्यांना प्रेमानं सगळे चिंटू हाक मारत असतं. त्यामुळे ऋषी कपूर यांच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली होती. त्यांनी या आपल्या आत्मचरित्रातून त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये असलेल्या शीतयुद्धाबद्दलही लिहिले आहे. परंतु हे शीतयुद्ध नक्की काय होतं? 


ऋषी कपूर आपल्या लिहितात, ''मला वाटतं की अमिताभ हे दु:खी होते कारण मला बॉबी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. मला खात्री आहे की अमिताभ यांना त्यांच्या त्याचवर्षी प्रदर्शित झालेल्या जंजीर या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळणंच योग्य वाटतं होतं. हे सांगायला मला लाज वाटते पण मी तो पुरस्कार विकत घेतला होता. मी त्यावेळी खूप निरागस, भोळा होतो. तारकनाथ गांधी हे पीआर होते तेव्हा ते मला म्हणाले होते की जर तुम्ही मला 30 हजार रूपये मिळाले तर मी तुम्हाला तो पुरस्कार मिळवून देईन. मी काहीच खोटं सांगणार नाही परंतु हे मी कबूल करतो की मी त्यासाठी त्यांना कसलाच विचार न करता पैसे दिले.''