Raja Shivaji Movie Release Date : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधाकीत मल्टी स्टारर सिनेमाची निर्मिती केली जात आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा 'राजा शिवाजी' या सिनेमाचा रिलीज डेट समोर आली आहे. एवढंच नव्हे तर रितेश देशमुखने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर कलाकारांची नावे जाहीर केली आहेत.
बहुचर्चित अशा या सिनेमाची अखेर रिलीज डेट समोर आली आहे. एवढंच नव्हे तर फर्स्ट लूक पोस्टर समोर आलं आहे.
महाराष्ट्राच आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नवा चित्रपट येऊ घातला आहे. बॉलिवूड आणि मराठीत या अगोदरही महाराजांवर आधारित सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. हाच वारसा पुढे जपत रितेश देशमुख 'राजा शिवाजी' हा सिनेमा घेऊन आला आहे. बुधवारी रितेशने याची रिलीज डेट देखील शेअर केली आहे. 1 मे 2026 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'राजा शिवाजी' या सिनेमात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख मुख्य भुमिकेत असणार आहे. आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे की, कोणता कलाकार कोणती ऐतिहासिक भुमिका साकारणार आहेत.
रितेश देशमुखचा हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. मूळ मराठी चित्रपट असण्यासोबतच, हा चित्रपट हिंदीसह इतर मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये सादर होणार आहे . केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर दिग्दर्शक म्हणूनही रितेश देशमुखने 'राजा शिवाजी'ची जबाबदारी घेतली आहे.