टीव्ही जगतातील लोकप्रिय चेहरा रित्विक धनजानी याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपला कास्टिंग काउचचा भयावह अनुभव सांगितला आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला रित्विक आज छोट्या पडद्यावरील आघाडीचा अभिनेता आणि सूत्रसंचालक म्हणून ओळखला जातो. पण आज ज्या उंचीवर तो आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष आणि त्रास सहन करावा लागला.
रित्विक धनजानीने आपल्या करिअरची सुरुवात लहानशा ऑडिशनपासून केली होती. मोठं नाव कमवायचं, ओळख निर्माण करायची हे स्वप्न मनात घेऊन तो मुंबईत आला. पण या स्वप्नांच्या शहरात पाऊल टाकताच त्याला कटू वास्तवाचा सामना करावा लागला. एका पॉडकास्टदरम्यान रित्विकने सांगितले की ही घटना त्याच्यासोबत तेव्हा घडली, जेव्हा तो फक्त 20 वर्षांचा होता. 'त्या काळात मी सतत ऑडिशन्स देत होतो. एकदा मला सांगण्यात आलं की माझी निवड झाली आहे, आणि मी खूप आनंदी झालो. पण मला अजिबात कल्पना नव्हती की पुढे माझ्यासोबत काय घडणार आहे,' असं तो म्हणाला.
रित्विक सांगतो, 'मी त्या कास्टिंग डायरेक्टरला विचारलं, ‘तुमचं ऑफिस कुठे आहे?’ तर तो म्हणाला, ‘तू ऑडिशला गेलास कसा?’ मी म्हणालो, ‘बाईकवर आलो.’ त्यावर तो म्हणाला, ‘चल, मलाही घेऊन चल.’ 'तो माझ्या बाईकवर बसला आणि मला एका अरुंद गल्लीत घेऊन गेला. मला तेव्हाच काहीतरी बरोबर नाही असं वाटू लागलं. वाटेत तो स्वतःबद्दल मोठमोठ्या गोष्टी सांगत होता, की त्याने अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना कास्ट केलं आहे. पण मला आतून भीती वाटत होती,” असं रित्विक पुढे सांगतो.
'तो मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागला…'
रित्विक म्हणतो, ;त्याने मला एका छोट्या खोलीत नेलं आणि माझं पोर्टफोलिओ दाखवायला सांगितलं. मी माझ्या सीडीवर प्रोजेक्ट्स दाखवत होतो. तो म्हणाला, ‘तू मेहनती आहेस, पण तुला हार्डवर्क नाही, स्मार्टवर्क करावं लागेल.’ पुढच्याच क्षणी त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायला सुरुवात केली.' त्या क्षणी रित्विक पूर्णपणे हादरला. 'मी लगेच उठलो, कसाबसा त्याच्या तावडीतून सुटलो आणि तिथून पळ काढला. मी थेट माझ्या मित्राकडे गेलो आणि तासन्तास रडलो. त्या घटनेने माझं आत्मविश्वासच हरवलं. मला वाटलं मी इंडस्ट्रीत पुढे कामच करू शकणार नाही,' असं त्याने सांगितलं.
रित्विक म्हणतो, 'त्या घटनेनंतर मी काही दिवस स्वतःमध्ये हरवून गेलो होतो. इंडस्ट्री सोडायचा निर्णय घेतला होता. पण माझ्या मित्रांनी, कुटुंबीयांनी मला धीर दिला आणि पुन्हा उभं राहायला मदत केली. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा त्या प्रसंगाने मला अधिक मजबूत बनवलं आहे.'
या सर्व संघर्षानंतर रित्विक धनजानीने छोट्या पडद्यावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘पवित्र रिश्ता’, ‘बंधनी’, ‘प्यार की एक कहानी’, आणि अनेक मालिकांमधील त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय, त्याने ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिए’, आणि इतर रिअॅलिटी शोमध्ये होस्ट म्हणूनही काम केले. त्याच्या सहजसुंदर अँकरिंग स्टाईलमुळे तो प्रेक्षकांचा आवडता सूत्रसंचालक बनला.
रित्विकने या अनुभवातून घेतलेला धडा सांगत म्हटले, 'प्रत्येक नवोदित कलाकाराने सतर्क राहायला हवं. स्वप्नं मोठी ठेवा, पण कुणाचं बळी बनू नका. चुकीचं काही घडतंय असं वाटलं, तर ताबडतोब दूर व्हा. आपली मर्यादा आणि सन्मान यांना नेहमी प्राधान्य द्या.'
FAQ
रित्विक धनजानीने कास्टिंग काउचबाबत काय खुलासा केला?
रित्विक धनजानीने सांगितले की, त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात, तो २० वर्षांचा असताना त्याच्यासोबत कास्टिंग काउचसारखी घटना घडली होती. एका कास्टिंग डायरेक्टरने त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यातून तो कसाबसा सुटला.
ही घटना कधी आणि कुठे घडली होती?
ही घटना मुंबईतील आरामनगर भागात घडली होती, जेव्हा रित्विक ऑडिशनसाठी गेला होता. त्यावेळी त्याने टीव्ही इंडस्ट्रीत नुकतीच सुरुवात केली होती.
या घटनेनंतर रित्विक धनजानीने काय निर्णय घेतला?
या भयानक अनुभवामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला आणि इंडस्ट्री सोडण्याचाही विचार केला. मात्र, मित्र आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने त्याने पुन्हा स्वतःला सावरले आणि आज तो टीव्ही इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेता आणि सूत्रसंचालक म्हणून ओळखला जातो.
कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे. ...Read More
|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(18.2 ov) 55
|
VS |
ESP
58/1(4.4 ov)
|
| Spain beat Croatia by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.