दर महिन्याला घटस्फोटाच्या चर्चा, पण करवाचौथला गोविंदाने बायकोला सोन्याचा नेकलेस घालून केलं सगळ्यांना थक्क

Sunita Ahuja's Special Gift : करवा चौथचा सण देशभरात जल्लोषात साजरा झाला. या विशेष दिवशी गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा खास चर्चेत आली. तिने करवाचौथसाठी सजूनधजून गोविंदाकडून मिळालेलं सुंदर गिफ्ट सोन्याचा नेकलेस सर्वांना दाखवलं. नेहमीप्रमाणे दोघांची केमिस्ट्री चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली.

Intern | Updated: Oct 11, 2025, 11:54 AM IST
दर महिन्याला घटस्फोटाच्या चर्चा, पण करवाचौथला गोविंदाने बायकोला सोन्याचा नेकलेस घालून केलं सगळ्यांना थक्क

वटपौर्णिमेप्रमाणेच करवा चौथ या सणालाही महिलांमध्ये प्रचंड उत्साह असतो. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केला जाणारा हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात पार पडतो. या दिवशी महिला पारंपरिक वेशभूषेत सजूनधजून उपवास करतात आणि संध्याकाळी नवऱ्याच्या हातून पाणी घेत उपवास सोडतात. यावेळी नवऱ्याकडून मिळणारं खास गिफ्ट हे प्रत्येक पत्नीसाठी उत्सुकतेचा विषय असतो. बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने यंदाच्या करवा चौथनिमित्त सोशल मीडियावर तिच्या पतीकडून मिळालेली एक खास भेट दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुनीताने तिच्या इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हिरव्या पारंपरिक ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या गळ्यात गोविंदाने दिलेला सोन्याचा नेकलेस झळकत आहे. हे फोटो शेअर करताना सुनीताने खोडकर अंदाजात लिहिलं आहे 'सोना कितना सोना है, गोविंदा हा हिरो नंबर 1 आहे, माझी करवा चौथची भेट आली आहे.' तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. एकाने कमेंट केली, 'गोविंदाची भेट आणि तुमची स्टाईल दोन्ही भन्नाट!' तर दुसऱ्याने म्हटलं, 'करवा चौथचा खरा हिरो म्हणजे गोविंदा!' सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच, गोविंदाने दिलेल्या या सोन्याच्या नेकलेसने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे. अनेक महिला चाहत्यांनी “सुनीता, तू खूप नशीबवान आहेस” अशा कमेंट्स केल्या आहेत.

Add Zee News as a Preferred Source

काही दिवसांपूर्वी मात्र गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, अभिनेता गोविंदाचे वकील ललित बिंदल आणि मॅनेजर शशी यांनी या बातम्या फेटाळून लावत स्पष्ट केलं की, 'ही जुनी गोष्ट आहे जी पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या दोघांमध्ये सर्व काही उत्तम आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.' दरम्यान, सुनीता आहुजाने काही महिन्यांपूर्वी स्वतःचं YouTube चॅनेल सुरू केलं आहे, जिथे ती तिच्या दैनंदिन आयुष्याचे व्लॉग शेअर करते. तिचा पहिला व्लॉग, ज्यात तिने कुटुंबातील देवींचं दर्शन घडवलं, तो प्रेक्षकांना प्रचंड आवडला आणि सुपरहिट ठरला. सध्या तिचे नवीन फोटो आणि गोविंदाकडून मिळालेली ही सोन्याची भेट चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

FAQ
गोविंदाने सुनीता आहुजाला करवाचौथला काय गिफ्ट दिलं?
गोविंदाने करवाचौथच्या निमित्ताने पत्नी सुनीता आहुजाला एक सुंदर सोन्याचा नेकलेस गिफ्ट दिला, जो तिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून चाहत्यांना दाखवला.

सुनीता आहुजा आणि गोविंदामधील घटस्फोटाच्या अफवा खऱ्या आहेत का?
नाही. अभिनेता गोविंदाचे वकील ललित बिंदल आणि मॅनेजर शशी यांनी या अफवा पूर्णपणे फेटाळल्या असून दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सुनीता आहुजाचं YouTube चॅनेल कशाबद्दल आहे?
सुनीता आहुजाच्या YouTube चॅनेलवर ती तिच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित व्लॉग्स शेअर करते. तिचा पहिला व्लॉग, ज्यात तिने कुटुंबातील देवींचं दर्शन घडवलं, तो प्रेक्षकांनी खूप पसंत केला.

About the Author