COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सचिन पिळगांवकर यांच्याकडे अष्टपैलू कलाकार पाहिलं जातं. बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलेले सचिन पिळगांवकर यांनी आपल्या बॉलिवूड आणि मराठी सिनेमांत अभिनय केला. काही दिवसांपूर्वी सचिन पिळगांवकर यांच  'मुंबई अँथम' हे गाणं सोशल मीडियावर ट्रोल झालं होतं. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्यांच आणखी एक गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 


हे गाणं आहे 'दिमाग मैं भूसा'. सचिन पिळगांवकर यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणं देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यावर देखील समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना हे गाणं आवडलं तर काहींनी पिळगांवकर तुमच्याकडून अशा अपेक्षा नाहीत अशा कमेंट केल्या आहेत. आपल्याला माहित आहे, या अगोदर देखील सचिन पिळगांवकर यांनी 'मुंबई अँथम' या गाण्यावर डान्स केला होता. यामुळे ते सोशल मीडियावर खूप ट्रोल झाले होते. आताचं हे गाणं देखील शेमारू कंपनीने लाँच केलं आहे. 


युट्यूबवर शेमारू कंपनीच्या मालकीचे असणाऱ्या ‘शेमारू बॉलीगोली’ या अकाउंटवरून १६ ऑगस्ट रोजी ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. मुंबईतील जीवनशैलीवर आधारित असलेले हे गाणे सचिन पिळगावकर यांनीच गायले आहे. मात्र गाण्याची शब्दरचना, संगीत आणि विनोदी प्रकारे चित्रीत करण्यात आलेल्या व्हिडीओमुळे ते ट्रोल होत आहे. अनेकांनी सचिन पिळगावकर यांनी या व्हिडीओमध्ये काम केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडीओखालील कमेन्टसही एकदम मजेदार असून अनेकांनी पिळगावकर यांच्यावर निशाणा साधला आहे.