'सेक्रेड गेम्स'मधील नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिलेल्या इंटिमेट सीननंतर का रडली होती कुकू?

 'सेक्रेड गेम्स' वेब सीरिजमध्ये ट्रान्स वुमन 'कुकू'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुब्रा सैतने शोमध्ये एक इंटिमेट सीन दिला होता.

Updated: Oct 24, 2021, 06:42 PM IST
'सेक्रेड गेम्स'मधील नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिलेल्या इंटिमेट सीननंतर का रडली होती कुकू?

मुंबई : 'सेक्रेड गेम्स' वेब सीरिजमध्ये ट्रान्स वुमन 'कुकू'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुब्बरा सैतने शोमध्ये एक इंटिमेट सीन दिला होता. अभिनेत्रीने याच्या शूटिंगबद्दल सविस्तरपणे सांगितलं आहे. तो सीन शूट केल्यानंतर तो कसा बनला होता याबद्दल तिने सांगितलं आहे. या वेब सीरिजमध्ये ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बोल्ड सीन्स करताना दिसली होती.

कुब्रा सैतने शेअर केला अनुभव 
एका वृत्तानुसार, कुब्रा सैतने एका मुलाखतीत उघड केलं की हे सीन सात वेळा शूट करण्यात आला कारण दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना सात वेगवेगळ्या दृष्टीकोनातून हा सीन सादर करायचा होता. कुब्रा म्हणाली की, अनुरागने सगळ्या अँगलने शूट केला, त्याला कंन्फर्म करायचं होतं की, शूट सुरळीत पार पडण्यासाठी सगळं काही ठीक होतं?

बोल्ड सीननंतर कुब्राची अवस्था वाईट झाली होती
एका मुलाखतीमध्ये बोलताना कुब्रा सैत म्हणाली, 'मी जेव्हा पहिला टेक घेतला तेव्हा तो आला आणि म्हणाला की, पुढचा टेक लवकर करू. दुसऱ्या टेक नंतर, तो म्हणाला की आम्ही पुढचे टेक पटकन करू. तिसऱ्यांदा मी असं केल्यावर त्याने कॅमेरा नवाजुद्दीन सिद्दीकीकडे वळवला. मग आम्ही काहीतरी वेगळं केलं आणि सातव्यांदा जेव्हा मी केलं... तेव्हा मी पूर्णपणे मोडून पडले. त्यावेळी मी खरोखरच मोडून पडले होते. मी खूप भावूक झाले आणि तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, 'धन्यवाद. मी तुला बाहेर भेटू?' तेव्हा मला फायनली वाटलं की हा सीन संपला आहे.

कुब्रा रडतच राहिली
पुढे कुब्रा सैत म्हणाली की, अनुराग गेल्यानंतर ती तुटली. ती म्हणाली, 'मी जमिनीवर पडले होते, मी फक्त रडत रडत होते. नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, मला वाटतं की तुम्ही बाहेर जावं कारण माझा सीन अजून शूट होणं बाकी आहे. कुब्रा हसून म्हणते, 'त्याचा एन्ट्री सीन अजून शूट व्हायचा होता'