मुंबई : 'साहो' चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने ३२० कोटी रुपयांची कमाई केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर स्टारर चित्रपटातील आणखी एक 'बेबी वॉन्ट यू टेल मी' गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. गाण्यामध्ये दोघांमधील प्रेमाची सुरूवात चाहत्यांना अनुभवता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'साहो' चित्रपट पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. 'साहो'तील सायको सय्या आणि इन्नी सोनी ही दोन गाणीही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. जवळपास १५० कोटींच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या 'साहो' चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीथ यांनी केले आहे.


'साहो' हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे. नील नितिन मुकेश अशी तगडी स्टारकास्टही भूमिका साकारणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी 'साहो' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.