Sai Tamhankar Video : नुकताच अभिनेत्री सई ताम्हणकरचा पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सई ताम्हणकर नेहमी तिच्या वेगवेगळ्या भूमिकाने प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. नवीन वर्षाची सुरुवात अभिनेत्रीने आव्हानात्मक केली आहे. ज्यामध्ये सई ताम्हणकर अभिनयाच्या पलिकडे जाऊन पायलट बनली आहे. ती पायलट होण्याचं प्रशिक्षण घेताना दिसत आहे. ती जिद्दीनं हे प्रशिक्षण पू्र्ण करत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, सई ताम्हणकरचा पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.
सईचा पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ व्हायरल
नुकताच सई ताम्हणकरचा पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये सई ताम्हणकर थोडीशी घाबरलेली आहे असं म्हणताना दिसतेय. तर त्या ठिकाणी असणारा एक व्यक्ती तिला थोडसं घाबरणं चालतं, पण जास्त घाबरणं चांगलं नाही असं सांगत आहे. यानंतर सई मोठ्याने ओरडताना दिसतेय. कारण तिच्या मनात सोलो फ्लाइटसाठी धाकधूक दिसत आहे. पण तिने जिद्द सोडली नाही तिला अवकाशात झेप घेण्याचा आनंद घेयचा होता. सध्या सई ताम्हणकरच्या या व्हिडीओ चाहते देखील प्रचंड कमेंट्स करत आहे. त्यासोबतच काही चाहते तिच्या धाडसाचे देखील कौतुक करत आहेत.
पॅराग्लायडिंग केल्यानंतर सई ताम्हणकरने तिचा आनंद व्यक्त केला आहे. तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी गड जिकंलास अशी कमेंट केली आहे. तर स्वप्नील जोशीने Whoaaaaaa!! kadakkkkk!! अशी प्रतिक्रिया दिलीय. अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
सध्या सई ताम्हणकर महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठीवरील कार्यक्रमात हास्यरसिक या भूमिकेत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ती 'मानवत मर्डर्स' या सीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये तिने समंद्रीची भूमिका साकारली होती. सई ताम्हणकरच्या या सीरिजला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले होते.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
NZ
(50 ov) 300/8
|
VS |
IND
306/6(49 ov)
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.