मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सलमान खान सध्या जामीनासाठी जोधपूर उच्च न्यायालयामध्ये दाद मागत आहे. शनिवारी सलमान खानच्या जामिनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 
 
सलमान खान जोधपूर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्यामुळे सलमान खानवर बॉलिवूडचे 500 कोटींचे भवितव्य पणाला लागले आहे. सलमान खानच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक मंडळी  त्याचा पाठीशी उभी  राहिली आहेत. परंतू एका अभिनेत्रीने सलमान खानला झालेल्या शिक्षेबाबत आनंद व्यक्त केला आहे.  


सलमान खानच्या शिक्षेमुळे सोफियाला आनंद  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री सोफिया हयातने सलमान खानला झालेल्या शिक्षेबाबत आनंद व्यक्त केला आहे. सोफियाने त्याबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच याप्रकरणी तिची मतं व्यक्त केली आहेत. सोफियाने शेअर केलेल्या फोटोवरही ' नो मोअर बीईंग ह्युमन' असे लिहले आहे.  


 



काय म्हणाली सोफिया हयात 


सोफियाने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहली आहे. सोफियाच्या मते, अनेकांना असे वाटते की सलमान खान बॉलिवूडवर नियंत्रण ठेवतो. पण मला बोलायची भीती नाही. आज कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही याचा प्रत्यय आला आहे. कायद्याने सलमान खानला शिक्षा ठोठावली. आज मी म्हणू शकते, ' हिंदुस्तान झिंदाबाद' ...  जया बच्चनना सलमान खानचा पुळका, शिक्षा सुनावल्यानंतर म्हणतात...


कैदी नंबर 106 


 सलमान खानला जोधपूरच्या जेलमधील दोन नंबरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. सलमान आता जोधपूर जेलमधील १०६ नंबरचा कैदी आहे. सलमान जेलमध्ये आल्यानंतर त्याचा बीपी थोडा वाढल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विक्रम सिंग यांनी दिली. सलमानला ५ वर्षांची शिक्षा, जेलमध्ये आसारामच्या शेजारी राहणार


इतर कलाकारांची निर्दोष सुटका


दरम्यान, सलमानला शिक्षा झाली असली तरी सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू या चौघांची मात्र या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. मात्र, त्यांच्या सुटकेवर बिश्नोई समाजानं नाराजी व्यक्त केली. या निकालाविरोधात बिष्णोई समाज वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती बिष्णोई समाजाच्या नेत्यांनी दिली. त्यामुळं हे काळवीट शिकारी प्रकरण आणखी काही काळ न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता आहे.