'जितकं आयुष्य आहे तितकं...', जीवे मारण्याच्या धमकीवर सलमान खान पहिल्यांदाच बोलला

Salman Khan on Lawrence Bishnoi's Death Threats : लॉरेन्स बिश्नोईच्या जीवे मारण्याच्या धमकीवर सलमान खाननं पहिल्यांदाच सोडलं मौन

दिक्षा पाटील | Updated: Mar 27, 2025, 11:42 AM IST
'जितकं आयुष्य आहे तितकं...', जीवे मारण्याच्या धमकीवर सलमान खान पहिल्यांदाच बोलला
(Photo Credit : Social Media)

Salman Khan on Lawrence Bishnoi's Death Threats : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सलमान हा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यावेळी एका मुलाखतीत सलमान खाननं लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून त्याला सतत मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर आता मौन सोडलं. तर याशिवाय तो म्हणाला की 'जितकं आयुष्य लिहिलं आहे ते तितकच मिळणार.'

सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनच्या वेळी सलमान खाननं दिलेल्या मुलाखतीत गेल्या काही महिन्यांपासून लॉरेन्स बिश्नोईकडून मिळणाऱ्या जिवेमारण्याच्या धमकीवर वक्तव्य केलं. त्याशिवाय सतत मिळणाऱ्या धमक्या असल्या तरी सुद्धा सलमाननं त्याच्या प्रोफेशनल कमिटमेंट परिणाम होऊ दिला नाही. त्यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला की त्याला त्याच्या सुरक्षेची चिंता आहे? तर सलमाननं आभाळाकडे हात करत म्हटलं की 'देव, अल्लाह सगळे वरती आहेत. जितकं आयुष्य लिहिलेलं असेल, तितकं लिहिलं आहे. फक्त हेच आहे. कधी-कधी इतक्या लोकांना सोबत घ्यावं लागलं फक्त इतकीच अडचण आहे.'

महत्त्वाचं म्हणजे तीन वर्षांमध्ये सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर आणि मित्रांर लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गच्या निशाण्यावर आहे. सगळ्यात आधी सलीम खान यांना मॉर्निंग वॉकच्या दरम्यान, धमकी देणारं पत्र देण्यात आलं. त्यानंतर सलमानच्या घर आणि फार्म हाऊसची रेकी करण्यात आली. हे सगळं इथेच थांबलं नाही तर सलमानच्या घरावर फायरिंग देखील करण्यात आली. या सगळ्यानंतर सलमान खानचं संपूर्ण कुटुंब हे घाबरलं आहे. 

दरम्यान, सलमानच्या विरोधात हा सगळा कट लॉरेन्स बिश्नोई का करत आहे असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर त्याचं कारण सांगत लॉरेन्स बिश्नोई म्हणाला होता की 'हम साथ साथ हैं' च्या शूटिंग दरम्यान, कथितपणे त्यानं काळविटाची शिकार केली होती. बिश्नोई समाज हे काळविटाला खूप महत्त्व देतात. 2018 मध्ये जोधपुरमध्ये कोर्टात बिश्नोईनं सांगितलं होतं की 'आम्ही सलमान खानची हत्या करू. एकदा जेव्हा आम्ही त्याच्यावर काही अ‍ॅक्शन घेऊ तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. अजूनही मी काहीही केलेलं नाही. हे कोणतंही कारण नसताना माझ्यावर आरोप करत आहेत.'

सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट 30 मार्च रोजी ईदच्या निमित्तानं थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादॉस यांनी केलं आहे. तर या चित्रपटात रश्मिका मंदाना ही सलमानसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.