Salman Khan On 31 Year Age Gap With Actress: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'सिकंदर' चित्रपटाचा ट्रेलर रविवारी रिलीज झाला. ए. आर. मुर्गुदास यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामध्ये 59 वर्षीय सलमान खान 28 वर्षीय रश्मिका मंदानासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मात्र वयाचं एवढं मोठं अंतर असताना सलमानने या चित्रपटाला होकार कसा दिला असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचसंदर्भात सलमानला ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आळा. यावर सलमान खानने त्याला ट्रोल करणाऱ्यांना खोचक उत्तर देताना भविष्यात रश्मिकाला मुलगी झाली तर तिच्या मुलीबरोबरही आपण काम करु, असं म्हटलं. सलमानचं हे उत्तर ऐकून एकच हशा पिकला.
तुझ्यात आणि रश्मिकामध्ये 31 वर्षांचं अंतर आहे, असा संदर्भ देत प्रमुख कलकारांमधील वयाच्या फरकाचा मुद्दा एका पत्रकराने उपस्थित केला. मात्र यावरुनच सलमानने खोचक टोला लगावला. "जेव्हा हिरोईनला काही अडचण नाही तर तुम्हाला काय अडचण आहे? हिचं (रश्मिकाचं) लग्न होईल, तिला मुलगी होईल तर तिच्यासोबतही मी काम करेन. तिच्या आईची याला परवानगी तर असेलच," असं उत्तर सलमानने दिलं. हे उत्तर ऐकून सर्वच हसू लागले.
याच चर्चेदरम्यान, सलमान खानने रश्मिका मंधानाचं कौतुक केलं आहे. रश्मिका फारच कष्ट करणारी, कामाचे नियम पाळणारी असून तिच्यातील हा उत्साह पाहून मला स्वत:च्या करिअरचे सुरुवातीचे दिवस आठवल्याचंही सलमान म्हणाला. एकाच वेळी रश्मिका कशाप्रकारे 'पुष्पा-2' आणि 'सिकंदर' या दोन्ही मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होती हे ही सलमानने सांगितलं. "रश्मिका 'पुष्पा-2'साठी संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम करायची. त्यानंतर ती 9 वाजता 'सिकंदर'च्या सेटवर यायची आणि पहाटे साडेसहापर्यंत काम करायची. त्यानंतर पुन्हा ती 'पुष्पा'च्या सेटवर जायची. तिला बरंही वाटत नव्हतं. तिने तिचा पाय मोडून घेतल्यानंतर तिने काम थांबवलं नाही. तिने एका दिवसाचंही शुटींग रद्द केलं नाही. तिला पाहून मला माझे तरुणपणाचे दिवस आठवले," असं सलमान म्हणाला.
#WATCH | Mumbai: On the 31-year age gap between him and upcoming film 'Sikandar' co-star Rashmika Mandanna, actor Salman Khan says, "They say there is a 31-year difference between the heroine and me. If the heroine and her father don't have any problem, then why do you have a… pic.twitter.com/qNBIFLNmrH
— ANI (@ANI) March 24, 2025
सलमान आणि रश्मिकाबरोबरच 'सिकंदर'मध्ये कालज अगरवाल, सत्यराज, सुनील शेट्टी, शर्मन जोशी आणि प्रतिक बब्बर यासारखे नामवंत कलाकार आहेत. आमिर खानचा 'गजनी'चे दिग्दर्शक ए. आर. मुर्गुदास यांनी 'सिकंदर'चं दिग्दर्शन केलं आहे. सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपटही ए. आर. मुर्गुदास यांनी दिग्दर्शित केला होता. मात्र या चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्यामुळेच आता 'सिकंदर' तिकीटबारीवर उत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. 'सिकंदर' हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.