12 वर्षांनंतर सलमान खानने दाखवली वाढत्या कुटुंबाची झलक, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का!

Salman Khan Post: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अशातच त्याची एक इन्स्टाग्राम पोस्ट खूपच व्हायरल होत आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 18, 2025, 08:13 PM IST
12 वर्षांनंतर सलमान खानने दाखवली वाढत्या कुटुंबाची झलक, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का!

Salman Khan Post: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’मुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र, यावेळी तो आपल्या नवीन सोशल मीडिया पोस्टमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहताच चाहत्यांचे डोळे थक्क झाले आहेत. या पोस्टमध्ये सलमान खानने आपल्या वाढत्या कुटुंबाचा परिचय करून दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

सलमान खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या संपूर्ण कुटुंबाची झलक दिसत आहे. ज्यात सलीम खान, अरबाज खान, सोहेल खान, अरहान खान, अलीझेह अग्निहोत्री आणि बहिण अल्विरा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सलमान खानने एक जुना फोटोही पोस्ट केला आहे, ज्यात अरबाज खानसोबत त्याची माजी पत्नी मलायका अरोरा आणि सोहेल खानसोबत त्याची माजी पत्नी सीमा सजदेह दिसत आहेत.

सलमान खानच्या पोस्टमध्ये काय? 

या पोस्टमुळे सलमान खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याच्या चाहत्यांनी या पोस्टवर कॉमेंट्सचा पाऊस पाडला असून, अनेकांनी सलमान खानच्या ‘फॅमिली बॉन्डिंग’चं कौतुक देखील केलं आहे.

सलमान खानने ही पोस्ट शेअर करताना त्यासोबत एक भावनिक कॅप्शनही दिलं आहे. त्याने म्हटलं की, 12 वर्षांपूर्वी बीइंग ह्युमन क्लोदिंगची सुरुवात एका साध्या विचारातून झाली. काही चांगलं करावं, लोकांना मदत करावी आणि हसू पसरवावं. आज हा केवळ एक ब्रँड राहिलेला नाही तर हा एक कुटुंब आहे जो सतत वाढत आहे. या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार. बीइंग ह्युमनसाठी धन्यवाद असं त्याने म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, सलमान खानच्या दोन्ही भावांचा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक महत्त्वाचा भागही या पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता तर सोहेल खान आणि सीमा सजदेह यांचं 2022 मध्ये विभक्त झाले होते. त्या दोघांच्या लग्नविच्छेदाच्या बातम्यांनी त्यावेळी चाहत्यांना धक्का बसला होता.

सध्या मात्र सलमान खान आपल्या कुटुंबासह पुन्हा एकत्र आलेल्या या आठवणींचा आनंद घेताना दिसतो आहे आणि त्याची ही पोस्ट चाहत्यांसाठी एक भावनिक भेट ठरली आहे.

FAQ

सलमान खानने इन्स्टाग्रामवर काय पोस्ट शेअर केले?

सलमान खानने १८ ऑक्टोबर २०२५ रोजी इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले. यात त्याच्या वाढत्या कुटुंबाची झलक दिसते, ज्यात कुटुंबातील सदस्यांसह जुने फोटो आहेत. ही पोस्ट Being Human Clothing ब्रँडच्या १२ वर्षांच्या पूर्तीची आहे.

पोस्टमधील कुटुंबातील सदस्य कोण कोणते?

व्हिडिओमध्ये सलीम खान, अरबाज खान, सोहेल खान, अरहान खान, अलीझेह अग्निहोत्री आणि अल्विरा खान अग्निहोत्री यांचा समावेश आहे. याशिवाय, एका जुन्या फोटोत अरबाज खानसोबत मलायका अरोरा आणि सोहेल खानसोबत सीमा सजदेह दिसत आहेत, ज्यामुळे कुटुंबाच्या एकजुटीची आठवण करून दिली जाते.

सलमान खानने गॅप्शनमध्ये काय म्हटले?

सलमान यांनी गॅप्शनमध्ये म्हटले, "१२ वर्षांपूर्वी Being Human Clothingची सुरुवात एका साध्या विचारातून झाली – काही चांगलं करावं, लोकांना मदत करावी आणि हसू पसरवावं. आज हा केवळ एक ब्रँड राहिलेला नाही तर हा एक कुटुंब आहे जो सतत वाढत आहे. या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार. Being Humanसाठी धन्यवाद."

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More