सलमान खान जिला सर्वांसमोर खांद्यावर घेऊन गेला, ती 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची बायको! ओळखलंत का?

Salman Khan : सलमान खानचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सगळीकडे त्याची चांगलीच चर्चा होते. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 18, 2025, 03:45 PM IST
सलमान खान जिला सर्वांसमोर खांद्यावर घेऊन गेला, ती 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची बायको! ओळखलंत का?
(Photo Credit : Social Media)

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. त्याचा शर्टलेस लूकतर आजही चर्चेचा विषय ठरतो. सलमान सध्या त्याच्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सिकंदर चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सगळ्यात त्याचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यापैकी सलमानचा एक अवॉर्ड शोच्या स्टेजवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका मुलीला खांद्यावर उचलून तो निघून जातो ते दाखवण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया काय आहे प्रकरण...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फिल्मफेयरच्या इन्स्टाग्रामवरून हा जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान हा स्टेजवर परफॉर्म करताना दिसला. व्हिडीओ सलमान खान स्टेजवर परफॉर्म करताना दिसला. व्हिडीओमध्ये सलमानचा शर्टलेस लूक दिसत आहे. या सगळ्यात एक मुलगी त्याच्यासोबत स्टेजवर डान्स करते आणि सलमान तिला खांद्यावर उचलून घेऊन जातो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pony Verma (@ponyprakashraj)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare)

कोण आहे ही मुलगी? 

तुम्हाला माहितीये का ही मुलगी एक अभिनेत्याची पत्नी आहे. आता कोण ही अभिनेत्री हे जाणून घेऊया. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव पोनी वर्मा आहे आणि ती लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांची दुसरी पत्नी आहे. पोनी ही फक्त प्रकाश राज यांची पत्नी नाही तर यशस्वी कोरियोग्राफर देखील आहे. प्रकाश राज यांनी पोनी वर्माशी लग्न करण्या आधी अभिनेता ललिता कुमारीशी 1994 मध्ये पहिलं लग्न केलं होतं. या लग्नातून त्यांना दोन मुली झाल्या. त्यांची नावं मेघना आणि पूजा आहे. ललितासोबत प्रकाश राज यांचं हे नाकं 15 वर्षांपर्यंत राहिलं त्यानं त्यांनी 2009 मध्ये घटस्फोट घेतला. तर 2010 मध्ये प्रकाश राजनं पोनी वर्मासोबत दुसरं लग्न केलं. इतकंच नाही तर लग्नाच्या 11 वर्षानंतर प्रकाश राज यांनी पोनी वर्माशी पुन्हा एकदा लग्न केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pony Verma (@ponyprakashraj)

हेही वाचा : कावड यात्रेसाठी आजोळी पोहोचली प्राजक्ता माळी; अभिनेत्रीचं गाव कुठे माहितीये?

व्हिडीओमध्ये पोनीसोबत डान्स करताना सलमान खान थोडा अनकम्फर्टेबल असल्याचं दिसत आहे. डान्स करताना मध्येच सलमान पोनीला खांद्यावर उचलून घेते आणि तिथून निघून जातो. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला विचित्र असल्याचं म्हटलं आहे. पोनी विषयी बोलायचं झालं तर तिनं विद्या बालनचा लोकप्रिय ठरलेला ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातील उ-लाला या गाण्याची कोरियोग्राफी केली आहे. त्यासोबत ‘चांदनी चौक टू चाइना’, ‘भूल भुलैया’, ‘हलचल’ पासून अनेक चित्रपटांसाठी गाणी कोरियोग्राफ केली आहेत.