सलमान खान 'या' चित्रपटात साकारणार होता ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका, पण एका चित्रपटाने सगळं बदललं!

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा या चित्रपट बनणार होता ऐश्वर्या रायचा भाऊ. कोणता आहे तो चित्रपट?   

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 8, 2025, 08:49 PM IST
सलमान खान 'या' चित्रपटात साकारणार होता ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका, पण एका चित्रपटाने सगळं बदललं!

Salman Khan: बॉलिवूडच्या इतिहासात अनेक चित्रपट आणि त्यामागच्या कास्टिंगच्या गोष्टींनी प्रेक्षकांची नेहमीच उत्सुकता वाढवली आहे. अशातच नुकताच ‘जोश’ या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकत्र काम करणार होते. पण यात एक ट्विस्ट होता. सलमान ऐश्वर्याचा भाऊ साकारणार होता.

Add Zee News as a Preferred Source

1990 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘जोश’ या चित्रपटात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांनी भाऊ–बहिणीची भूमिका साकारली होती. पण सुरुवातीच्या नियोजनानुसार ही भूमिका सलमान खानला ऑफर करण्यात आली होती. त्या काळात सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांना डेट करत होते. दोघांचं नातं ‘हम दिल दे चुके सनम’च्या शूटिंगदरम्यान फुललं होतं. तरीदेखील सलमानने ‘जोश’मध्ये तिचा भाऊ बनण्याची तयारी दाखवली होती.

निर्माता रतन जैन यांचा खुलासा

रतन जैन यांनी ‘टीव्ही9 भारतवर्ष’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, 'सुरुवातीला आमिर खान आणि शाहरुख खानला अनुक्रमे चंद्रचूड आणि मॅक्सची भूमिका ऑफर केली होती. पण आमिरला मॅक्सचा रोल हवा होता. मी मात्र म्हणालो की हा रोल फक्त शाहरुखच करू शकतो नाहीतर मी चित्रपट करणार नाही.'

आमिर आणि दिग्दर्शक मंसूर खान यांच्या चर्चेदरम्यान हा मतभेद झाला. जेव्हा शाहरुखला हे समजलं की आमिरही त्याच रोलमध्ये रस घेतो आहे. तेव्हा त्याने थेट नरेशन सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि म्हटलं, 'जर आमिर मॅक्स करणार असेल तर मी हा चित्रपट करणार नाही.'

 ‘जोश’मध्ये कास्टिंग कसं बदललं?

शाहरुख बाहेर पडल्यावर चित्रपट काही काळासाठी थांबला. नंतर सलमान खानला तोच रोल ऑफर करण्यात आला. सलमानने रस दाखवला पण त्याच काळात त्याला संजय लीला भन्साळींचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा प्रोजेक्ट मिळाला. त्या चित्रपटातच त्याचा आणि ऐश्वर्याचा रोमँटिक ऑनस्क्रीन प्रवास सुरू झाला. त्यामुळे शेवटी सलमानची जास्त ओढ ‘हम दिल दे चुके सनम’कडेच राहिली आणि त्याने ‘जोश’ चित्रपट सोडून दिला.

'मी पुन्हा शाहरुखकडे गेलो आणि सांगितलं की सलमानकडून विशेष उत्सुकता दिसत नाही. तेव्हा शाहरुख म्हणाला की थोडा वेळ दे. पण मी आग्रह धरला ‘आता तूच हा चित्रपट करायला हवा, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे.’ दुसऱ्या दिवशी शाहरुखने फोन करून होकार दिला.' अशा पद्धतीने शाहरुख खान पुन्हा ‘जोश’चा भाग बनला आणि ऐश्वर्यासोबत भाऊ–बहिणीची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली.

FAQ

‘जोश’ चित्रपटात मूळतः कोण कलाकार असणार होते?

सुरुवातीला शाहरुख खान आणि आमिर खान यांना मुख्य भूमिका ऑफर करण्यात आली होती. आमिरला मात्र मॅक्सचा रोल हवा होता, जो नंतर शाहरुखकडे गेला.

सलमान खानचा ‘जोश’शी काय संबंध होता?

शाहरुखने चित्रपटातून बाहेर पडल्यावर मॅक्सची भूमिका सलमान खानला ऑफर करण्यात आली होती. त्याने सुरुवातीला होकारही दिला होता, पण नंतर ‘हम दिल दे चुके सनम’ मिळाल्याने त्याने ‘जोश’ नाकारला.

सलमान आणि ऐश्वर्या राय एकत्र या चित्रपटात का दिसले नाहीत?

कारण त्या काळात दोघे वास्तविक आयुष्यात एकमेकांना डेट करत होते. ‘जोश’मध्ये त्यांना भाऊ–बहिणीची भूमिका साकारायची होती, जे थोडं विचित्र वाटलं असतं. त्यामुळे शेवटी सलमानने मागे हटण्याचा निर्णय घेतला.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More