लग्नानंतर अवघ्या 4 दिवसांतच समांथा घराबाहेर; सेटवरील फोटोची सगळीकडेच चर्चा

Samantha Ruth Prabhu: दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि 'द फॅमिली मॅन' चे दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्या लग्नाला पाच दिवस झाले आहेत. या जोडप्याने 1डिसेंबर 2025 रोजी लग्नगाठ बांधली.   

Updated: Dec 6, 2025, 09:56 AM IST
लग्नानंतर अवघ्या 4 दिवसांतच समांथा घराबाहेर; सेटवरील फोटोची सगळीकडेच चर्चा
Photo credits - Social Media

Samantha Ruth Prabhu: समांथा रूथ प्रभु आणि राज निदिमोरू यांच्या लग्नाला अवघे चार ते पाच दिवस झाले असताना समांथानं एक मोठा निर्णय घेतला आहे. इतर जोडप्यांप्रमाणं या नव्या इनिंसाठी अपेक्षित सुट्टी न घेताच समांथानं इतर गोष्टींना प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्यासाठी ती घराबाहेरसुद्धा पडली आहे. तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात लग्न केले. समंथाने तिच्या इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनापार गेला. पण, आता मात्र ती यातूनही बाहेर पडली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अवघ्या 4 दिवसांतच समांथा घराबाहेर? 
लग्नानंतर एकिकडे व्यक्तिगत आयुष्याला प्राधान्य देत असतानाच समांथानं तिच्या कामालासुद्धा प्राधान्य दिलं आहे. तिने अलीकडेच तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला समांथाने एक छानशी कॅप्शनसुद्धा दिली आहे. ही कॅप्शन सध्या चाहत्यांना खूप पसंत पडत आहे. 

तिच्या लग्नाबद्दल सर्वजण कमेंट करत होते आणि शुभेच्छा देत होते. दरम्यान, लग्नाच्या पाच दिवसांनी समांथा कामावर परतली आहे. शुक्रवारी तिने तिच्या आगामी 'मा इंती बंगाराम' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. समांथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधील एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये अभिनेत्री मेकअप खुर्चीवर बसून दिग्दर्शक नंदिनी रेड्डी आणि मेकअप आर्टिस्ट अवनी रंभिया यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येत आहे. तिने पोस्टला  "Lezzz Go" असे कॅप्शन दिले आणि चित्रपटाचा हॅशटॅग जोडला. 
 
फोटोमध्ये, समांथाच्या हातावर आणि पायावर तिच्या लग्नाची मेहंदी स्पष्टपणे दिसत आहे. तिने शूटसाठी कॅज्युअल टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. समांथाच्या आणि राजच्या लग्नाची भाकितं 30 नोव्हेंबरपासून केली जात होती.  दुसऱ्या दिवशी, समांथाने स्वतः तिच्या लग्नाची पुष्टी केली आणि लग्नाचे फोटो शेअर केले. विशेष म्हणजे, नंदिनी रेड्डी, शिल्पा रेड्डी आणि क्रेशा बजाज देखील लग्नात सहभागी झाल्या होत्या. समांथाने लग्नासाठी लाल आणि सोनेरी पारंपारिक साडी घातली होती. त्या लूकने समांथाच्या चाहत्यांना अगदी भूरळ घातली.

Samanth on shutting

समांथाने 2017 मध्ये नागा चैतन्यशी लग्न केले
समांथा रूथ प्रभू यांचे व्यक्तिगत आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. समांथाने यापूर्वी 2017 मध्ये अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले होते. पण, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2021मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. चाहत्यांना अजूनही त्यांच्या वेगळे होण्याचं कारण कळलं नाही मात्र समांथाने राज निदिमोरूशी लग्न केल्याने चाहते आनंदी आहेत. 

समांथा रुथचा आगामी चित्रपट 

कामाच्या बाबतीत, समांथाने 2025 मध्ये प्रदर्शित झालेला हॉरर कॉमेडी 'शुभम' चित्रपट तयार केला आणि 2024 मध्ये 'सिटाडेल: हनी बनी' मध्ये दिसली. तिने यापूर्वी राजसोबत 'सिटाडेल' आणि 2021 मध्ये आलेल्या 'द फॅमिली मॅन' सीझन 2 मध्ये काम केले आहे. तिचा नवीन चित्रपट, 'मा इंती बंगाराम', गुलशन देवैया आणि दिगंत यांच्या भूमिका असतील. आता समांथाचा भलामोठा चाहता वर्ग या चित्रपटाला कसा प्रतिसाद देईल हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

FAQ

1. चाहते याबद्दल काय म्हणाले?
ग्नामुळे खूप आनंदी आहेत आणि लग्नानंतर तात्काळ कामावर परतल्याबद्दलही कौतुक करतायत.

2. लग्नाला किती दिवस झाले की समंथा कामावर परतली?
अवघ्या ४-५ दिवसांतच (शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ पासून) ती शूटिंगला परतली

3. सध्या समंथा कोणत्या चित्रपटाचे शूटिंग करतेय?
‘मा इंती बंगाराम’ या चित्रपटाचे शूटिंग करतेय. दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी.

About the Author