Sameer Khandekar Tejas Express Vistadome : मराठी भाषा जपण्यासाठी अनेक लोक मेहनत करताना दिसत आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या परिणनं मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी झडताना दिसत आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेत लोक यासाठी लढत आहेत. आज काल जर एखादा बॉलिवूड सेलिब्रिटी मराठीत काही बोलला तरी सगळ्यांना आनंद होतो. आपले मराठी कलाकार हे नेहमीच सोशल मीडियावर मराठी भाषेविषयी बोलताना दिसतात. त्यांच्या पोस्टला असलेले कॅप्शन हे बऱ्याचवेळा मराठीतचं देतात. आता एका मराठी अभिनेत्यानं भारतीय रेल्वेमध्ये असलेल्या इंडिकेरवर मराठी भाषेत येणाऱ्या काही सुचनांचा व्हिडीओ शेअर करत किती अशुद्ध मराठी वापरली आहे ते सांगितलं आहे. इतकंच काय तर त्यांनं भारतीय रेल्वेला जाब देखील विचारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा मराठमोळा अभिनेता समीर खांडेकर आहे. समीरनं त्याची ही पोस्ट ‘तेजस एक्सप्रेस’ मध्ये प्रवास करताना आलेल्या अनुभवाविषयी आहे. ‘तेजस एक्सप्रेस’ मध्ये सगळ्या सुविधा आहेत. अशा ट्रेनमध्ये मराठी भाषेत झालेली ही चूक म्हणजे वाईट आहे असं त्याचं थोडक्यात म्हणणं आहे. समीरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत समीर आधी स्वत: ला दाखवतो आणि त्यानंतर ‘तेजस एक्सप्रेस’ मध्ये असलेल्या इंडिकेटरवर मराठीत असलेल्या काही सुचना दाखवल्या आहेत. यावर लिहिलं होतं की ‘तुमची आपल्या वस्तू एका बाजूला ठेवू नये.’ ‘कृपया आपल्या जोडीदारावर लक्ष ठेवावे.’ ‘कृपया चालू गाडीमध्ये चडू नये.’ ‘ही रेल्वे छ. शिवाजी महाराज स्टेशन वासून मडगांव स्टेशन पर्यंत जाणार आहे.’ ‘तुमच्या प्रवास सुखाचा आणि सोयीची हो ही भारतीय रेल्वेची शुभेच्छा.’ या मराठी भाषेतील सुचना आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती आय मास्क लावून झोपलेली असं दृश्य समीरनं दाखवलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : Salman Khan च्या बहीणीच्या घरी चोरी; 5 लाख रुपयांचा ऐवज चोरीला


हा व्हिडीओ शेअर करत 'आम्ही Dome मधून बाहेर बघण्यातच रमलेलो असतो. प्रिय, इंडियन रेल्वे, मराठी माध्यमातल्या चौथीतल्या मुलांकडून लिहून घेतलं असतं, तरी चाललं असतं! या सूचना ज्यांनी कुणी लिहिल्या आहेत त्यांना दंडवत प्रणाम. कृपया, वेळीच त्यात बदल करा,' असे समीर खांडेकरने कॅप्शन दिले आहे. या पुढे समीरनं आणखी एक कमेंट केली असून त्यात तो म्हणाला, मित्र/ मैत्रीणींनो खूप लाईक्स आणि फॉलोवर्स मिळावेत म्हणून पोस्ट नाही केली. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी संबधीत हॅंडलला ट्वीट करुन या Tejas Express Vistadome मधल्या चुकीच्या “मराठी सूचनांची” दखल घ्यायला भाग पाडा..