Sangeeta Bijlani on her Wedding Card : बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या खासगी आयुष्याला घेऊन नेहमीच चर्चेत असतो. त्याचं नाव ऐश्वर्या राय, कतरिना कैफ आणि सोमी अलीसोबत जोडण्यात आलं होतं. पण अशी पण एक अभिनेत्री आहे जिच्यासोबत तो लग्न करणार होता आणि त्या दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील छापण्यात आली होती. ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून संगीता बिजलानी आहे. सलमानसोबत लग्नाच्या पत्रिका छापण्यात आल्या आणि ते लग्न करणार होते. याविषयी नुकत्याच एका कार्यक्रमात संगीता बिजलानीला हा प्रश्न विचारण्यात आला तर यावर संगीतानं नकार दिला नाही.
इंडियन आयडलनं एका प्रोमोमध्ये हा संपूर्ण प्रकार दिसून आला आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. संगीता बिजलानी यावेळी पाहुणी म्हणून पोहोचली होती. त्यावेळी संगीताला तिच्या आणि सलमानच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. स्पर्धक म्हणाली, आम्ही ऐकलं आहे की तुझ्या आणि सलमान सरांच्या लग्नाची पत्रिका छापली होती का? त्यावर परिक्षकांसोबत बसलेली संगीता बिजलानी म्हणाली की 'हो, हे खोटं तरी नाही.'
रिपोर्ट्सनुसार, सलमानचं फिल्मी करियर सुरु होण्याआधीत संगीतासोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघं जवळपास आठ वर्ष एकमेकांना डेट करत होते. लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या होत्या. पण कोणत्याही बंधनात अडकण्याआधीत दोघं विभक्त झाले. दोघांच्या ब्रेकअपच्या मागचं खरं कारणं समोर आलेलं नाही. पण अशा बातम्या होत्या की पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अलीमुळे त्यांचा ब्रेकअप झाला होता. सोमीनं या बातमीला दुजोरा दिला होता.
हेही वाचा : हनी सिंग भारतीय महिलांना का डेट करत नाही? कारण खूपच धक्कादायक
सलमान खानची लव्ह लाइफ ही नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. पण त्यानं त्याच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. दरम्यान, येणाऱ्या वर्षात त्याचा सिंकदर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर त्यानं नुकताच त्याचा 59 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचा वाढदिवसानिमित्तानं अंबानी कुटुंबानं जामनगरमध्ये आलिशान पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीतील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.