संगीता बिजलानीला घरात चोरीचा धक्का, अभिनेत्री म्हणाली 'माझ्या घरात सुरक्षित नाहीस वाटतं'

Sangeeta Bijlani theft at home: संगीता बिजलानीच्या घरात चोरीची घटना घडली असून, तिने यावर एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली आहे.

Intern | Updated: Oct 12, 2025, 04:14 PM IST
संगीता बिजलानीला घरात चोरीचा धक्का, अभिनेत्री म्हणाली 'माझ्या घरात सुरक्षित नाहीस वाटतं'

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची माजी प्रेमिका संगीता बिजलानी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे अजूनही चर्चेत असते. ती अनेकदा खान कुटुंबाच्या कार्यक्रमांमध्येही दिसते. मात्र, नुकतीच तिच्या घरात चोरी झाली असून, याबाबत तिने ताजी माहिती दिली आहे. अभिनेत्री संगीता बिजलानी पुण्यात एका पुरस्कार सोहळ्यात हजर झाली होती. या कार्यक्रमादरम्यान, तिने महिलांची सुरक्षा, चोरीच्या वाढत्या घटना आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत आयएएनएसशी खुलासा केला.

Add Zee News as a Preferred Source

संगीता पुणे एसपींना भेटली

फार्महाऊसवरील चोरीबद्दल बोलताना संगीता म्हणाली, 'मी पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांना भेटले. माझ्या घरात चोरी झाली असल्याने मी चौकशीसाठी विशेषतः पुण्यात आले होते. एक महिला म्हणून मला माझ्या स्वतःच्या घरात असुरक्षित वाटतंय. मी तिथे 20 वर्षांपासून राहते, ते माझं घर आहे, पण यावेळी पहिल्यांदाच असुरक्षिततेची भावना आली.' अभिनेत्रीने पुढे स्पष्ट केले, 'हे फक्त माझ्यासाठी नाही तर प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण आपल्या कुटुंबासह तिथे राहतो, त्यामुळे घर सुरक्षित असणं खूप गरजेचं आहे.' सुरक्षेबाबत संगीता म्हणाली की, फार्महाऊसच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, काही भाग खूप अंधारात आहेत. सुट्टीच्या काळात लोक तिथे येतात, त्यामुळे पोलिसांनी दररोज उपस्थित राहून वातावरण बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच, या परिसराजवळ अग्निशमन दलाचं कार्यालय नाही, त्यामुळे फार्महाऊसपर्यंत पोहोचायला त्यांना 3-4 तासांचा वेळ लागतो.

चोरीची घटना

जुलै महिन्यात पावणा येथील संगीता बिजलानीच्या फार्महाऊसमध्ये चोरी झाली होती. चोरांनी मुख्य दरवाजा आणि खिडकी तोडून, रेफ्रिजरेटर, टीव्ही सेट, बेड आणि सीसीटीव्ही कॅमेरेसह अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या. अभिनेत्रीने पुणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अद्याप या प्रकरणाची कोणतीही माहिती मिळालेली नाही. संगीता बिजलानीच्या या प्रतिक्रिया आणि सुरक्षा उपायांवरील आवाहनामुळे, स्थानिक पोलिसांवर दबाव निर्माण झाला आहे आणि प्रेक्षक व चाहत्यांमध्येही घर सुरक्षिततेबाबत चर्चा सुरु आहे.

FAQ

संगीता बिजलानीच्या घरात काय घडलं?

जुलै महिन्यात पावणा येथील संगीता बिजलानीच्या फार्महाऊसमध्ये चोरी झाली होती. चोरांनी मुख्य दरवाजा आणि खिडकी तोडून रेफ्रिजरेटर, टीव्ही सेट, बेड, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या.

संगीता बिजलानीने या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली?

अभिनेत्री म्हणाली की, तिला तिच्या घरात असुरक्षित वाटत आहे. तिने पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांना भेटून चौकशीसाठी विनंती केली आणि महिलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचा आग्रह धरला.

संगीता बिजलानीने सुरक्षिततेसाठी कोणते उपाय सुचवले?

संगीता म्हणाली की, फार्महाऊस परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, पोलिस दररोज उपस्थित राहावेत, आणि वातावरण बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तिने अग्निशमन दलाच्या कार्यालयाची कमतरता देखील लक्षात आणली आणि आणखी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली.

About the Author