एकेकाळी ढाब्यावर भांडी घासायचा हा अभिनेता, दिलाय ब्लॉकबस्टर चित्रपट, वडिलांच्या निधनानंतर इंडस्ट्रीपासून आहे दूर

हिंदी चित्रपटसृष्टीतील हा अभिनेता जो पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक पात्रात जीवंतपणा आणायचा. मात्र, वडिलांच्या निधनानंतर  इंडस्ट्रीपासून आहे दूर.   

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 6, 2025, 01:36 PM IST
एकेकाळी ढाब्यावर भांडी घासायचा हा अभिनेता, दिलाय ब्लॉकबस्टर चित्रपट, वडिलांच्या निधनानंतर इंडस्ट्रीपासून आहे दूर

Sanjay Mishra Birthday : भारतीय चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे असतात जे कलाकारांच्या चमकदार दुनियेतही आपली सत्यता आणि संवेदनशीलता टिकवून ठेवतात. संजय मिश्रा हे त्याच प्रकारचे अभिनेते आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रामाणिक आणि सशक्त अभिनेत्यांपैकी एक असलेले संजय मिश्रा हे वाराणसीच्या गल्लीबोळांतून निघून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पर्यंतचा प्रवास करणारे कलाकार आहेत. अभिनयाचा त्यांनी असा अभ्यास केला की, ते कॅमेऱ्यासमोर उभे राहिले की वास्तव आणि अभिनय यांच्यामधली रेषाच नाहीशी होते.

Add Zee News as a Preferred Source

संजय मिश्रा हे ‘गोलमाल’च्या विनोदी विश्वात असो वा ‘आंखों देखी’च्या आत्मचिंतनात्मक प्रवासात प्रत्येक भूमिकेत आपली सच्चाई, संवेदना आणि गहराई ओततात. ते प्रसिद्धीच्या मागे धावत नाहीत; उलट, लहानशी भूमिकाही ते अशा पद्धतीने साकारतात की ती प्रेक्षकांच्या मनात कोरली जाते. त्यांचे शब्द स्वतःच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहेत. 

अभिनयाचा प्रवास

संजय मिश्रा यांनी आपल्या कारकिर्दीत शाहरुख खान, आमिर खान, आयुष्मान खुराना, कार्तिक आर्यन आणि विद्या बालन अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. रोहित शेट्टी यांच्यासोबत त्यांनी ‘गोलमाल’, ‘ऑल द बेस्ट’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकलं, तर ‘सत्या’, ‘दिल से’, ‘धमाल’, ‘मसान’, ‘किक’, ‘कडवी हवा’ आणि ‘सन ऑफ सरदार 2’ सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही लक्षात राहतात.

2014 मध्ये आलेला ‘आंखों देखी’ हा चित्रपट संजय मिश्रांच्या कारकिर्दीतील माइलस्टोन ठरला. या चित्रपटात त्यांनी ‘राजे बाबू’ नावाचं पात्र साकारलं. जो असा माणूस आहे, जो ठरवतो की तो आता फक्त तेवढंच मानेल, जे त्याच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. हे पात्र इतके त्यांच्या मनात आणि आयुष्यात शिरते की शूटिंग संपल्यानंतरही ते त्या व्यक्तिरेखेचं आयुष्य जगत राहिले.

संजय मिश्रा यांनी त्यांचा चित्रपट का पाहिला नाही? 

चित्रपटाच्या प्रीमियरसाठी जेव्हा त्यांना निमंत्रण दिलं गेलं तेव्हा त्यांनी जाण्यास नकार दिला. कारण विचारल्यावर त्यांचं उत्तर विचार करायला लावणारं होतं. ते म्हणाले मी हा चित्रपट एका प्रेक्षकासारखा पाहू शकत नाही. जर मी ‘राजे बाबू’ म्हणून पाहिला तर मला वाटेल मी खोटं पाहतो आहे असं ते म्हणाले. 

त्यांनी सांगितलं की हा चित्रपट त्यांनी पाहिला नाही तर जगला आहे. हीच त्यांची प्रामाणिकता त्यांना इतरांपासून वेगळं ठरवते. त्यामुळेच ‘आंखों देखी’चा राजे बाबू आजही लोकांच्या मनात जिवंत आहे आणि संजय मिश्रा यांना भारतीय सिनेमातील एक अमर कलाकार बनवून गेले.

FAQ

संजय मिश्रा यांना हिंदी चित्रपटसृष्टीत कशासाठी ओळखले जाते? 

 संजय मिश्रा यांना प्रामाणिक, सशक्त आणि संवेदनशील अभिनेत्यांसाठी ओळखले जाते. ते वास्तव आणि अभिनय यांच्यातील रेषा पुसून टाकतात, आणि लहान भूमिकाही अमर करतात.

संजय मिश्रा यांचा प्रवास कसा? 

 वाराणसीच्या गल्लीबोळांतून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंतचा प्रवास. त्यांनी शाहरुख खान, आमिर खान, आयुष्मान खुराना, कार्तिक आर्यन आणि विद्या बालन यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले.

संजय मिश्रा यांचे प्रमुख चित्रपट कोणते? 

 ‘गोलमाल’, ‘ऑल द बेस्ट’ (विनोदी), ‘सत्या’, ‘दिल से’, ‘धमाल’, ‘मसान’, ‘किक’, ‘कडवी हवा’ आणि ‘सन ऑफ सरदार २’ हे प्रमुख चित्रपट आहेत. रोहित शेट्टींसोबत विनोदी भूमिका आणि इतरांमध्ये गहन भूमिका गाजवल्या.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More