अभिनेत्री लारा दत्ताला इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत पाहून ट्विटरवर बनतोय #लारादत्त टॉप ट्रेंड
`बेल बॉटम` हा 1984च्या घटनेवर आधारित स्पाय थ्रिलर आहे.
मुंबई : अक्षय कुमारच्या बेल बॉटम चित्रपटाचा ट्रेलर पाहणाऱ्यांसाठी, ट्रेलरमध्ये सरप्राईज एलिमेंट लारा दत्ताच्या रूपात आला आहे. बेल बॉटम हा 1984च्या घटनेवर आधारित स्पाय थ्रिलर आहे अभिनेत्री लारा दत्ताने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
46 वर्षीय अभिनेत्री माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. लाराचा लूक पाहून लाराला ओळखणं कठिण झालं आहे. ट्रेलर पाहून सोशल मीडिया युजर्स हैराण झाले आहेत. ती या लूकमध्ये अगदी इंदिरा गांधींसारखी दिसत आहे. मंगळवारी संध्याकाळी बेल बॉटम ट्रेलर रिलीज झाल्यानंतर #लारादत्त हा ट्विटरचा टॉप ट्रेंड बनला आहे.
लारा दत्ताचा लूक पाहून युजर्स आश्चर्यचकित
ट्विटरवर युजर्सने याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजर्सने लिहिलं "ओएमजी... ही आमची मिस युनिव्हर्स लारा दत्ता आहे. ... आम्ही या चित्रपटाची वाट पाहत आहोत" दुसरा युजर्स म्हणाला: "लारा दत्ता आहे का? ओळखणं कठीण आहे."
'या' अभिनेत्रींनी निभावली इंदिरा गांधी यांची भूमिका
मराठी सिनेमा 'यशवंतराव चव्हाण' या सिनेमात सुप्रिया विनोद यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. तर विवेक ऑबेरॉयच्या नरेंद्र मोदी या सिनेमात किशोरी शहाणे यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. तर ठाकरे सिनेमांत अवंतिका अकरकर यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. याचबरोबर लवकरच अभिनेत्री कंगना रानौत देखील आगामी सिनेमांत इंदिरा गांधी यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अक्षय कुमार गुप्त एजंटच्या भूमिकेत
बेल बॉटममध्ये अक्षय कुमार एका गुप्त एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री वाणी कपूर त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात हुमा कुरेशीही आहे. बेल बॉटम हा एक सत्यकथेवर आधारित स्पाय थ्रिलर आहे हा सिनेमा १ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात दाखल होईल.