)
Shah rukh khan: दिवाळीचा उत्साह सध्या सुरू आहे. ठिकठिकाणी फटाके फोडून व रांगोळी काढत दिवाळी साजरी केली जात आहे. आज लक्ष्मीपूजन आहे. घराघरात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानने देखील त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, नेहमीच ग्रँड पार्टी देणाऱ्या शाहरुख खानने मात्र साधेपणाने दिवाळी साजरी केली आहे. यंदा मन्नतमध्ये रिनोव्हेशनचे काम सुरू असल्यामुळं साधेपणाने सेलिब्रेशन केले आहे.
शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर चाहत्यांना इमोशनल मेसेज लिहिला आहे. एक फोटोदेखील शेअर करत, यात पत्नी गौरी खान दिवाळीची पूजा करताना दिसत आहे. तसंच, कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. देवी लक्ष्मी तुम्हाला समृद्धी आणि आनंद देईल. सर्वांसाठी प्रेम आणि शांतीची प्रार्थना करतो. या पोस्टवर शाहरुखच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुख नेहमीच मन्नतमध्ये दिवाळी पार्टी आयोजित करतात. मात्र घराचे रिनोव्हेशन सुरू असल्यामुळं घरातच साधेपणाने दिवाळी साजरी केली. शाहरुखने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्याच्या या साधेपणाचे कौतुकदेखील केले आहे.
Happy Diwali to everyone! May Goddess Lakshmi ji bless you with prosperity and happiness. Wishing love, light and peace to all. pic.twitter.com/kHzH3or17a
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 20, 2025
सध्या शाहरुख खान फिल्म सेट आणि फॉरेन प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. सध्या युरोपमध्ये किंगची शुटिंग सुरू आहे. मागील आठवड्याच शाहरुख जॉय फोरममध्ये दिसला होता. तिथे त्याने कोरियाचे फिल्म लीजेंड ली जंग-जे सह दुसऱ्या कलाकारांची भेट घेतली. किंगमध्ये शाहरुख पहिल्यांदा त्याची मुलगी सुहानासोबत झळकणार आहे. तर चित्रपटात दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्याचबरोबर राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चनसारखे कलाकारदेखील झळकणार आहेत.