Shah Rukh Khan Tirupati Balaji Temple : बॉलिवूड अभिनेता किंग खान शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत असताना आता फक्त त्याला दोन दिवस बाकी आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट खूप हिट झाला पाहिजे यासाठी शाहरुख सतत चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. अशात त्याला अनेक मंदिरांमध्ये जाताना स्पॉट करण्यात आले. काही दिवसांपूर्वी तो वैष्णो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता. तर आता तो थेट आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या तिरुपती बालाजीचे दर्शन करण्यासाठी पोहोचला आहे. यावेळी व्यंकटेश मंदिरात गेलेल्या शाहरुख खानसोबत त्याची लाडकी लेक सुहाना खान आणि जवान चित्रपटातील त्याची लीड अॅक्ट्रेस नयनतारा देखील होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानचा हा व्हिडीओ एएनआयनं शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहरुख, सुहाना, नयनतारा, नयनताराचा पती विग्नेश शिवम दिसत आहेत. यावेळी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी देखील दिसत आहे.  शाहरुखला पाहताच तिथे असलेले लोक हे त्याला आवाज देऊ लागतात. त्यानंतर शाहरुख चाहत्यांच्या दिशेल हात हलवत त्यांना हॅलो म्हणतं मी इथेच आहे असा इशारा देताना दिसला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 



जवान विषयी बोलायचे झाले तर हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. अॅटली हा या चित्रपटाचा को-रायटर देखील आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखचा डबल रोल आहे. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि आणि सान्या मल्होत्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर दीपिका पदुकोणची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. तर सपोर्टिंग भूमिकेत अभिनेता सुनील ग्रोवर, रिद्धी डोगरा यांच्यासह अनेक कलाकार आहेत. 


हेही वाचा : Jawan Review: प्रदर्शनाच्या 2 दिवस आधीच आला रिव्ह्यू! जाणून घ्या कसा आहे चित्रपट अन् किती Stars मिळाले


 व्यंकटेश मंदिरात जाण्याआधी शाहरुख जम्मुला असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिरात देखील गेला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत शाहरुखचा चेहरा दिसत नसला तरी देखील त्याच्या चाहत्यांना त्याला ओळखले होते. त्याच्या आजुबाजूला खूप सिक्योरिटी देखील होती. शाहरुख त्याच्या पठाण या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी देखील वैष्णो देवीचे दर्शन करण्यासाठी गेला होता.