अभिनेता अक्षय खन्ना सध्या आपल्या नव्या स्पाय थ्रिलर ‘धुरंधर’ मधील ‘रहमान डकैत’ या धडाडीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. चित्रपटातल्या त्याच्या तीक्ष्ण, रहस्यमय आणि प्रभावी अभिनयाची सर्वत्र दाद मिळत आहे. सोशल मीडियावर त्याच्या भूमिकेतील अनेक क्लिप्स व्हायरल होत असून, प्रेक्षकांना या पात्राची शैली, संवादफेक आणि स्क्रीनवरचा त्याचा धमाकेदार वावर चांगलाच भावतो आहे.
याच दरम्यान अभिनेता अक्षय खन्ना आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ 2017 मधील ‘इत्तेफाक’ या थ्रिलर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा असून, त्यावेळी दोघांनीही पत्रकारांशी केलेली हलकी-फुलकी गप्पा सोशल मीडियावरून पुन्हा समोर आल्या आहेत. या व्हिडिओत शाहरुख खान अक्षयच्या स्वभावाविषयी विनोदी अंदाजात टिप्पणी करताना दिसतो आणि त्याच क्षणी अक्षयलाच एक मजेदार, पण अजब प्रश्न विचारतो 'तू असा का आहेस रे?'
गप्पांच्या दरम्यान शाहरुख खानने अक्षय खन्नाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि अभिनयशैलीचा मनापासून गौरव केला. शाहरुख म्हणाला, 'अक्षय नेहमीच थोडा ऑफबीट असतो. तो इतरांसारखा नाही. तो वेगळ्या तालावर नाचतो आणि मला त्याचं ते स्वतंत्र व्यक्तिमत्त्व खूप आवडतं. तो जेव्हा चित्रपट करतो, तेव्हा काहीतरी खास, अविश्वसनीय निर्माण करतो. एक अभिनेता म्हणून मी त्याचा खूप आदर करतो.' शाहरुखने अक्षयचं इतकं कौतुक केल्यानंतर त्याने एकदमच मजेत प्रश्न टाकला 'एवढं बोलून मी तुला हे विचारतो… तू असा का आहेस?' हा क्षण इतका अनपेक्षित होता की आजही नेटिझन्सना हा व्हिडिओ तितकाच मजेशीर वाटतो आहे.
‘धुरंधर’च्या रिलीजमुळे अक्षय खन्ना पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला लागला आहे. त्याच्या भूमिकेतील धमाकेदार क्लिप्स, चाहत्यांची प्रशंसा आणि सहकलाकारांच्या प्रतिक्रिया पाहताना हा जुना व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. अक्षयच्या शांत, अबोल, इन्ट्रोव्हर्ट स्वभावामुळे नेहमीच त्याच्याबद्दल एक वेगळी उत्सुकता राहिली आहे. पडद्यावर मात्र तो पूर्णपणे रंग बदलतो दमदार स्क्रीन प्रेझेन्स, तीक्ष्ण नजर, आणि अगदी थोडक्यात संवादातूनही प्रभाव टाकण्याची त्याची कला कमालीची आहे.
‘धुरंधर’मधील ‘रहमान डकैत’ म्हणून त्याचं काम प्रेक्षकांना इतकं आवडलं की त्याच्याशी संबंधित जुने व्हिडिओ, मुलाखती आणि किस्सेही पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले. नेटकरी म्हणत आहेत की 'अक्षय खन्नाला समजून घेणं जितकं अवघड, तितकंच त्याचं अभिनय पाहणं आनंददायी!' असं म्हणायला हरकत नाही की शाहरुख- अक्षयचा हा प्रसिद्ध व्हिडिओ आणि ‘धुरंधर’मधील त्याचा भेदक अभिनय दोन्ही मिळून अक्षय खन्नाला हल्ली सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये अगदी वरच्या स्थानी घेऊन गेले आहेत.
FAQ
अक्षय खन्ना आणि शाहरुख खानचा हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे?
हा व्हिडिओ 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इत्तेफाक’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. याच मुलाखतीत शाहरुख अक्षयला विनोदी अंदाजात विचारतो, “तू असा का आहेस?”
सध्या अक्षय खन्ना का ट्रेंड होत आहे?
अक्षय खन्ना आपल्या नव्या स्पाय थ्रिलर ‘धुरंधर’ मधील ‘रहमान डकैत’ या धडाडीच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. चित्रपटातील त्याचा दमदार अभिनय आणि व्हायरल क्लिप्समुळे तो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.
या व्हिडिओला पुन्हा चर्चेत का आणलं जात आहे?
अक्षयच्या ताज्या यशामुळे त्याच्याविषयीची उत्सुकता वाढली असून, चाहत्यांनी त्याचे जुने व्हिडिओ आणि मुलाखती पुन्हा शेअर करायला सुरुवात केली आहे. त्यात शाहरुखचा हा मजेशीर प्रश्न असलेला व्हिडिओ विशेष लोकप्रिय ठरत आहे.
कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.