रमजानमध्ये तिरूपती मंदिरात गेल्यानं शाहीर शेख ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Shaheer Sheikh Seeks Blessing at Tirupati Temple During Ramadan Month : रमजानच्या महिन्यात शाहिर शेखनं तिरूपती बालाजीच्या मंदिरात जाऊन घेतलं देवाचं दर्शन

दिक्षा पाटील | Updated: Mar 21, 2025, 01:55 PM IST
रमजानमध्ये तिरूपती मंदिरात गेल्यानं शाहीर शेख ट्रोलर्सच्या निशाण्यावर
(Photo Credit : Social Media)

Shaheer Sheikh Seeks Blessing at Tirupati Temple During Ramadan Month : छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय अशा पौराणिक मालिका आहेत. त्या पैकी एक म्हणजे 'महाभारत'. या मालिकेमुळे आपल्याला आपल्या पौराणिक गोष्टी सांगितल्या. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांना खूप प्रेम केलं. महाभारताच्या शाहीर शेख, सौरव गुर्जव आणि संपूर्ण कास्टनं आता तिरूपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. या ट्रिपच्या निमित्तानं ते सगळे एकत्र आले, अर्थात या मालिकेतून त्यांचं रीयूनियन झालं. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

त्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. तर शाहीर शेखनं देखील सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. महाभारतातील कलाकार सौरव गुर्जर, अहम शर्मा, अर्पित रांका, ठाकुर अनूप सिंह आणि त्यांच्या रीयूनियनचे काही काही फोटो शेअर केले आहेत. शाहीर शेखनं शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये कलाकारांनी मुंडू नेसली आहे. तर ही पोस्ट शेअर करत शाहीरनं कॅप्शन दिलं की '#मुंडू #गॅन्ग।'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shaheer Sheikh (@shaheernsheikh)

धृतराष्ट्रची भूमिका साकारणारा अभिनेता ठाकुर अनूप सिंहनं 'महाभारता'च्या सगळे कलाकार हे बऱ्याच काळानंतर पुन्हा तिरूपतीमध्ये एकत्र भेटल्यानं एक सुंदर अशी नोट लिहिली आहे. त्यानं सांगितलं की नेहमीच आम्ही भेटतो असं नाही. पण आम्ही भेटलो नसलं तरी आमच्यातलं नातं हे तितकंच चांगलं आहे. याविषयी सांगत त्यानं लिहीलं की 'आमचा महाभारत ग्रुप तिरूपतीमध्ये भेटलो तर आता काही सुंदर आठवणी तयार करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे आम्ही इतके भेटतही नाही. जास्तीत जास्त 6 महिन्यातून एकदा भेटतो तर कधी कधी वर्षभर भेटत नाही. पण हे फोटो आमच्यात असलेलं चांगलं नातं दर्शवतं. आम्ही कायम एकमेकांच्या आरोग्याविषयी विचारतो. जेव्हा केव्हा आम्ही भेटतो तेव्हा आमच्यातील एनर्जी खूप कमालीची असते. या 13 वर्षांनी जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो तर लक्षात येतं की आम्हाला महाभारताच्या प्रवासाला सुरुवात करण्याची तुलनेत आता आम्ही आणखी जवळ आलो आहोत. आम्ही फक्त 1 दिवस एकत्र असलो तरी आम्ही यावेळेत आम्ही खूप मज्जा केली. टीमला शुभेच्छा आणि अनेकदा असेच एकत्र येऊ यासाठी प्रार्थना.'

दरम्यान, अनेकांना शाहीर रमजानच्या महिन्यात मंदिरमध्ये गेला हे आवडलं नाही आणि ते त्याला ट्रोल करत धर्माचं पालन करण्याविषयी बोलू लागले. शाहीरनं त्याचा ऑन-स्क्रीन भाऊ अहम शर्मासोबत आणखी काही फोटो शेअर केले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अहम शर्मा त्याचा भाऊ कसा? तर या पौराणिक कथेत शाहीरनं अर्जुनची भूमिका साकारली होती तर अहमन सूर्यपुत्र कर्णची भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत फोटो शेअर करत शाहीरनं कॅप्शन दिलं की 'काही नाती ही कधीच बदलत नाहीत. #करणअर्जुन'