अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. साधेपणा, खुला स्वभाव आणि स्पष्ट बोलण्याच्या अंदाजामुळे लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या शहनाजनं यावेळी तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी केलेला खुलासा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच दिलेल्या मिर्ची पंजाबच्या मुलाखतीत शहनाज गिलनं एग फ्रीझिंग आणि मातृत्वाबाबत आपले विचार मांडले. ती म्हणाली, 'मला भविष्यात आई व्हायचं आहे, पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. सध्या माझं लक्ष फक्त माझ्या करिअर आणि वैयक्तिक प्रगतीकडे आहे.' तिच्या या वक्तव्याने चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
शहनाज म्हणाली, 'लग्नासाठी एक योग्य वय असतं आणि माझ्या मते ते वय साधारण 30 ते 31 वर्षांचं आहे. योग्य वेळी लग्न करणं महत्त्वाचं असतं, कारण आयुष्यातील प्रत्येक टप्प्याला आपला वेळ असतो. पण सध्या मी माझ्या कामावर फोकस करत आहे.' आई होण्याबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, 'कधी कधी मला आई व्हावंसं वाटतं. मुलांशी माझं भावनिक नातं खूप घट्ट आहे. पण सध्या माझ्याकडे ना लग्नासाठी, ना बाळांना जन्म देण्यासाठी वेळ आहे. माझ्या प्राधान्यक्रमात सध्या करिअर पहिल्या क्रमांकावर आहे.' तिने पुढे एग फ्रीझिंगबद्दल सांगताना स्पष्ट केलं की, 'भविष्यात मी आई व्हायचं ठरवलं तर मी एग फ्रीझ करण्याचा विचार करेन. सध्या मला बाळ नको आहे, पण योग्य वेळ आली आणि माझं करिअर स्थिर झालं, तेव्हा मी नक्कीच आई बनेन.' तिच्या या उत्तरातून दिसून येतं की, शहनाज मातृत्वाकडे जबाबदारीने आणि परिपक्वतेने पाहते.
शहनाज सध्या चित्रपट, जाहिराती आणि म्युझिक व्हिडीओमध्ये व्यस्त आहे. तिनं नुकताच ‘इक्क कुडी’ हा पंजाबी चित्रपट प्रदर्शित केला असून या चित्रपटातून ती केवळ मुख्य भूमिकेतच नव्हे तर निर्माती म्हणूनही प्रेक्षकांसमोर आली आहे. 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिच्या चाहत्यांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं असून, अभिनेत्री म्हणून शहनाज आता स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे.
FAQ
शहनाज गिलनं एग फ्रीझिंगबद्दल काय सांगितलं?
शहनाज गिलनं सांगितलं की ती भविष्यात आई होण्यासाठी एग फ्रीझ करण्याचा विचार करत आहे. सध्या ती करिअरकडे लक्ष केंद्रीत करू इच्छिते.
शहनाज गिलचं सध्याचं वय आणि विचार काय आहेत?
ती सध्या ३१ वर्षांची असून, तिच्या मते लग्नासाठी ३०-३१ हे योग्य वय आहे. मात्र, सध्या ती काम आणि प्रगतीला प्राधान्य देते.
शहनाज गिलचा अलीकडचा चित्रपट कोणता आहे?
शहनाजचा नुकताच प्रदर्शित झालेला पंजाबी चित्रपट ‘इक्क कुडी’ आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असून, निर्माती म्हणूनही तिनं पदार्पण केलं आहे.
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.