पद्म पुरस्कार जाहीर झाला तेव्हा नेमकं काय वाटलं? शंकर महादेवन म्हणाले, 'जेव्हा घोषणा झाली तेव्हा...'

Shankar Mahadevan : शंकर महादेवन यांनी 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव' या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला होता. 

दिक्षा पाटील | Updated: May 14, 2025, 03:37 PM IST
पद्म पुरस्कार जाहीर झाला तेव्हा नेमकं काय वाटलं? शंकर महादेवन म्हणाले, 'जेव्हा घोषणा झाली तेव्हा...'

Shankar Mahadevan : लोकप्रिय गायक शंकर महादेवन यांनी फक्त बॉलिवूड चित्रपटांसाठीच नाही तर मराठी चित्रपटांसाठी देखील गाणी गायली आहेत. त्यातही ते फक्त या दोन भाषांमध्ये अडकून राहिले नाही तर त्यांनी तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. काल 13 मे रोजी त्यांना आणखी एका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि तो म्हणजे झी 24 तास महाराष्ट्र रत्न. झी 24 च्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी त्यांना जेव्हा पद्म पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांच्या भावना काय होत्या याविषयी त्यांनी खुलासा केला आहे. 

 या पुरस्कार सोहळ्यात सीनियर सोनाली कुलकर्णीनं शंकर महादेवन यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत सीनियर सोनाली कुलकर्णीनं शंकर महादेवन यांना विचारलं की 'तुम्हाला आजवर इतके पुरस्कार मिळाले आणि आजही तुम्हाला एक पुरस्कार मिळणार आहे. ऐरवी पुरस्कार मिळतात आणि आपल्याला वाटतं की आपण वेळेवर पोहोचावं, आपल्या घरचे असावे, कधी असं वाटतं हे टिव्हीवर दिसेल आपल्या मित्रांना किती अभिमान वाटेल. तुम्हाला पद्म पुरस्कार मिळाला आहे, म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार, पद्म पुरस्कार याचं तुमच्यासाठी काय वैशिष्ठ्य आहे. तुम्हाला काही वेगळं वाटतं का? आपण कलाकार असतो आपल्याला देशासाठी काही करायला मिळतं.' याविषयी बोलताना शंकर महादेवन म्हणाले, 'जेव्हा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानीत करण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली तेव्हा काही कळलंच नाही की काय आहे कवढं मोठं आहे? मी तिथे गेलो आणि तिथे भव्यदिव्य वातावरण जे होतं. तेव्हा तुम्हाला ही जाणीव होते की हा पुरस्कार तुमच्या एका कामासाठी नाही अर्थात दिल चाहता हैं, म्हणजेच एका सिनेमासाठी आणि एका गाण्यासाठी नाही. तर, तुमच्या संगीतातून तुम्ही देशाला जे दिलं त्यासाठी हा पुरस्कार तुम्हाला देण्यात येतोय. '

पुढे याविषयी बोलताना शंकर महादेवन म्हणाले, 'ते तुम्हाला जे जाणवतं. तेव्हा तुम्हाला याची जाणीव होते की आता तुम्हाला आणखी मेहनत करण्याची गरज आहे. आणखी मेहनत करायची आणि चांगले म्युजिक बनवायचं. तुमच्या प्रेक्षकांसाठी तुमची काय जबाबदारी आहे ती समजते. असं म्युजिक ज्यातून मानवतेत काही बदल घडतील असं काम करायचं. त्यासाठी मला सगळ्यांचे आभारी मानायचे आहे की मी असं काही करू शकतो यासाठी मी योग्य आहे असं समजलंत.' त्यानंतर सोनाली कुलकर्णी यांनी शंकर महादेवन यांचे शुभेच्छा देत स्वागत केले.