क्रिकेटच्या मैदानात कॅच सोडला नवऱ्याने, बायकोला या मुद्द्यावर झापलं सासऱ्याने
शर्मिला टागोर यांनी 1968मध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी यांच्याशी लग्न केलं
मुंबई : क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीचं खूप जुनं नातं आहे. अनुष्का शर्मा-विराट कोहली, हरभजनसिंग-गीता बसरा, संगीता बिजलानी-अझरुद्दीन आणि शर्मिला टागोर मन्सूर अली खान पटौदी अशी बरीच उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही क्षेत्र पूर्णपणे वेगळी आहेत आणि त्यांचा बॅलन्स राखणं हे एक मोठं आव्हान आहे. विराट कोहलीच्या खराब परफॉर्म्ससाठी अनुष्का शर्माला अनेक वेळा टार्गेट केलं गेलं. ही काही नवीन गोष्ट नाही, असं यापूर्वीही अनेकवेळा घडलं आहे. शर्मिला टागोरांसोबतही असंच काहिसं झालं. त्या स्वत: याबद्दल बोलल्या होत्या.
शर्मिला टागोर यांनी 1968मध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी यांच्याशी लग्न केलं. शर्मिला त्या काळातील बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री होती, तर 'टायगर' पटौदी हे सुप्रसिद्ध क्रिकेट स्टार होते. शर्मिला म्हणाली की, केवळ अनुष्काच नाही तर तिच्या पतीच्या खराब परफॉर्मन्सबद्दल तिला देखील अनेकवेळा दोषी ठरविण्यात आलं होतं. एका मुलाखती दरम्यान शर्मिला म्हणाल्या. ''कदाचित तेव्हा टायगरने एक कॅच ड्रॉप केली होती किंवा असंच काहीतरी झालं होतं तेव्हा माझे वडील कुठूनतरी जोरात ओरडून म्हणाले, 'तुला त्याला रात्रभर जाग ठेवलं नाही पाहिजे.' तुम्ही विचार करू शकता?''
जेव्हा टायगरने शर्मिलासाठी कविता लिहिली
शर्मिलाने हे ही सांगितलं की, टायगरला कशी भेटले आणि त्यावेळी ते कसे ब्रिटीश भाषेत बोलायचे. त्यांची विनोदबुद्धी वेगळाच होता आणि ते स्वतःच्या जोक्सवर स्वतः हसायचे असेही ते म्हणाले. शर्मिलाने असंही सांगितले की, एकदा टायगरने तिच्यासाठी एक सुंदर कविता लिहिली होती, जेव्हा शर्मिलाने ती फिरोज खानला दाखविली तेव्हा असे दिसून आले की, या ओळी गालिबच्या आहेत.