राज कुंद्राच्या कारनाम्यानंतर घरातल्या कप-बशा फुटल्या, पतीवर शिल्पा शेट्टी भडकली

'एवढी सगळी लफडी केलीस पण मला कळू दिलं नाही', शिल्पा राज कुंद्रावर भडकली

Updated: Jul 26, 2021, 10:42 PM IST
राज कुंद्राच्या कारनाम्यानंतर घरातल्या कप-बशा फुटल्या, पतीवर शिल्पा शेट्टी भडकली

प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई: राज कुंद्राला डर्टी पिक्चर प्रकरणी अटक झाल्यानंतर आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आपल्या पतीला धारेवर धरली असून चांगलीच भडकली आहे. पॉर्न फिल्म रॅकेट उघडकीस आल्यानंतर शिल्पा शेट्टी राज कुंद्रावर चांगलीच भडकली. पोलिसांसमोर जबाब नोंदवताना शिल्पा आणि राजमध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांकडून मिळाली आहे. 

पॉ_र्न फिल्म रॅकेट उघडकीस आल्यानंतर शिल्पा शेट्टी राज कुंद्रावर चांगलीच संतापली होती. पोलिसांसमोर जबाब नोंदवताना शिल्पा आणि राजमध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी शिल्पा शेट्टी एवढी सगळी लफडी केलीस पण मला कळू दिलं नाही असं राज कुंद्राला म्हणत चांगलीच संतापली होती. 

जबाब नोंदवतांना शिल्पाला पोलिसांसमोर ढसाढसा रडूही आलं होतं. पॉ_र्न प्रकरणामुळे आपली इमेज खराब झाल्याची खंत शिल्पा शेट्टीला वाटत आहे. मात्र आता पर्यंतच्या तपासात शिल्पा शेट्टीचा अश्ली_ल रॅकेटमध्ये सक्रिय सहभाग असल्याची माहिती समोर आलेली नाही, अशी गुन्हे शाखा सूत्रांची माहिती दिली आहे.

 शिल्पा शेट्टी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे आमच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. शिवाय अनेक ब्रांड्सने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रोजेक्ट देखील माझ्या हातून गेले आहेत असंही शिल्पा म्हणाली होती. 

19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. ही चौकशी सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर राज कुंद्राला रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली. तर काल अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही कसून चौकशी करण्यात आली. राजला काल कोर्टात हजर केल्यानंतर अधिक चौकशीसाठी कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.