इरफान आणि ऋषी कपूर यांच्यापाठोपाठ बॉलिवूडने गमावलं आणखी एक रत्न
बॉलिवूडला आणखी एक धक्का
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीला आणखी एक धक्का मिळाला आहे. बॉलिवूडने फिल्म उद्योगातील आणखी एक रत्न गमावलं आहे. द फिल्म अँड टेलिव्हीजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया (The Film and Television Producers Guild of India) चे सीईओ कुलमीत मक्कड (Kulmeet Makkar) यांच निधन झालं आहे. फिल्ममेकर अशोक पंडितने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
अशोक पंडितने ट्विट करून माहिती दिली आहे की, 'माझे प्रिय मित्र कुलमीत यांच निधन झालं असून खूप वाईट वाटलं आहे. द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सीईओ यांच धर्मशालामध्ये हार्ट अटॅकमुळे निधन झालं आहे. तुमची भरपूर आठवण येईल. कुटुंबासाठी मी सहानुभूती व्यक्त करतो.'
बॉलिवूड दिग्दर्शक आणि प्रोड्यूसर करण जोहरने देखील याबाबत शोक व्यक्त केला आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटलंय की,'कुलमीत तू प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचा मजबूत स्तंभ आहे. तुम्ही इंडस्ट्रीच्या विकासाकरता मोठं योगदान दिलं आहे. तू खूप लवकर सोडून गेलास. तुमची आठवण येईल. तुमच्या आत्माला शांती लाभू दे.
सिनेसृष्टीला मिळालेला हा सर्वात मोठा झटका आलेय गुरूवारी ६७ वर्षीय ऋषी कपूर याचं निधन झालं. तर बुधवारी ५३ वर्षीय इरफान खानचा मृत्यू झाला. आणि आता कुलमीत यांचा मृत्यू झाल्यामुळे बॉलिवूडला खूप मोठा धक्का बसला आहे.