पतीच्या गैरहजेरीत श्रद्धा आर्याने कॅमेरासमोर केलं हे काम; व्हिडिओ समोर

श्रद्धाने अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं.

Updated: Mar 27, 2022, 05:13 PM IST
पतीच्या गैरहजेरीत श्रद्धा आर्याने कॅमेरासमोर केलं हे काम; व्हिडिओ समोर title=

मुंबई : कुंडली भाग्यमधील प्रीता म्हणजेच श्रद्धा आर्या आजकाल तिचा पती राहुल नागिलसोबत वेळ घालवताना दिसत आहे. हनिमून असो किंवा होळी असो, श्रध्दा आणि राहुल अनेकदा परफेक्ट कपल गोल सेट करताना दिसले आहेत. अलीकडेच श्रद्धाने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा पती राहुल नागल देखील दिसत आहे.

श्रद्धाचा हा व्हिडिओ खूपच गंमतीशीर आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या पतीच्या उंचीचा फायदा घेताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला श्रद्धाने लिहिलं आहे की, माझा नवरा घरी असतो तेव्हा मी असं वागते. व्हिडिओमध्ये श्रद्धा आर्या पती राहुलला किचनच्या वर ठेवलेला डब्बा काढून द्यायला सांगते. त्याचबरोबर श्रद्धाचा नवरा घरी नसताना ती किचन कट्ट्यावर उभी राहते आणि किचनमधील डब्बा काढून घेते. व्हिडिओ शेअर करत, श्रद्धाने एक मजेदार कॅप्शन देखील लिहिलं आहे, ज्यात ती म्हणाली आहे की, मी अशी का आहे.

नुकताच श्रद्धा आर्याने तिच्या पतीचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले. जे तिच्या चाहत्यांना चांगलेच आवडले. फोटोंमध्ये पती-पत्नी दोघंही रोमँन्टिक अंदाजात दिसत होते. गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला श्रद्धा आर्यने राहुल नागलसोबत सात फेरे घेतले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या अभिनेत्रीने अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. श्रद्धाने लग्नाआधी राहुलला डेट केलं होतं. मात्र तिने याबाबत कोणालाच कधीच काही कळू दिलं नाही. श्रद्धाचा नवरा नेवी ऑफिसर आहे. ज्याचा अभिनेत्रीला खूप अभिमान आहे.