बॉलिवूडमध्ये नेहमीच सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बातम्या चर्चेत राहतात. नुकतीच कृति सेननची बहीण नुपूर सेनन लग्नबंधनात अडकली, त्यानंतर आता एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ही अभिनेत्री कोण दुसरी नाही तर बॉलिवूड स्टार श्रद्धा कपूर.
सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे की श्रद्धा कपूर लवकरच तिच्या रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही सांगितले जात होते की अभिनेत्री उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याची योजना आखत आहे. मात्र या चर्चांवर आता श्रद्धाच्या भावाने सिद्धांत कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धांतने एका वाक्यात या बातम्यांना स्पष्ट नकार दिला आणि लिहिले, 'ही तर माझ्यासाठीही न्यूज आहे.'
सिद्धांतच्या या प्रतिक्रियेनुसार असे स्पष्ट होते की श्रद्धा सध्या लग्नाच्या मूडमध्ये नाही. मात्र चाहत्यांमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत उत्सुकता तितकीच जास्त आहे. सोशल मीडियावर श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या अफवा आणि चर्चा अजूनही जोर धरून आहेत.
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी डेट करत असल्याच्या चर्चांनाही अनेक वर्ष झाली आहेत. 2024 पासून त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या सोशल मीडियावरून समोर येत आहेत. मुंबईत दोघांना एकत्र पाहिल्याचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतरही अनेक पार्ट्या, फिल्म स्क्रीनिंग्स आणि इव्हेंट्समध्ये दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या रिलेशनशिपबाबत उत्सुकता कायम राहिली आहे.
करिअरच्या बाबतीत, श्रद्धा कपूरने शेवटची ‘स्त्री २’ या चित्रपटात काम केले होते. ही फिल्म बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली होती. या सिनेमात श्रद्धासह राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना हे कलाकारही झळकले होते. त्यानंतर श्रद्धाने नुकतंच ‘ईथा’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, ज्यात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या काळात ती ‘नागिन’ या सुपरनॅचरल भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. शिवाय ‘स्त्री ३’च्या निर्मितीबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे.
चित्रपटांबरोबरच चाहत्यांची उत्सुकता तिच्या वैयक्तिक आयुष्याकडेही आहे. सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये सतत चर्चा रंगत असते. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र दिसतात की नाही, लग्नाबाबत खऱ्या घडामोडी काय आहेत, याबाबत चाहत्यांना सतत उत्सुकता असते. मात्र सिद्धांत कपूरच्या स्पष्ट उत्तरानुसार असे दिसते की श्रद्धा सध्या केवळ आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलेली आहे.
दरम्यान, चाहत्यांना तिच्या नवीन चित्रपटांसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याच्या अपडेटचीही उत्सुकता आहे. सोशल मीडियावर श्रद्धाच्या चाहत्यांचा वर्ग प्रचंड सक्रिय असून तिच्या प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया देत राहतो. अशा परिस्थितीत, श्रद्धा कपूरचे लग्न, तिचे आगामी प्रोजेक्ट्स आणि रूमर्ड रिलेशनशिपबाबत बातम्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.
...Read More|
WI
(20 ov) 196/6
|
VS |
ENG
166(19 ov)
|
| West Indies beat England by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 215/5
|
VS |
BRN
164/7(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 182/6
|
VS |
IRE
115(16.5 ov)
|
| Australia beat Ireland by 67 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.