मुंबई : मराठमोळा अभिनेता सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची कन्या - अभिनेत्री श्रिया पिळगावकरनं कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. तिच्या 'मिर्झापूर' या वेब सीरीजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. आता श्रिया 'हाथी मेरे साथी' या चित्रपटात राणा दग्गुबत्तीसोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं श्रिया साऊथ फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री करतेय. परंतु श्रियाला मराठी चित्रपटात काम करण्यास रस नाही का? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जातोय. याला उत्तर देत श्रिया म्हणतेय...मराठी चित्रपट माझ्यासाठी खूप जवळचा आहे. माझ्या करियरची सुरूवात मी मराठी चित्रपटसृष्टीतून केली आहे.'एकुलती एक' हा माझा पहिला मराठी  चित्रपट आहे. मला आशा आहे की यावर्षी ही मी मराठी चित्रपटात काम करेन', असं श्रियानं म्हटलंय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही मालिका 'तू तू मैं मैं'मध्ये बिट्टूची भूमिका निभावण्यापासून श्रियानं अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली होती. बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या 'फॅन' या सिनेमातून बॉलिवूड एन्ट्री केली. आपल्या आगामी 'हाथी मेरे साथी' या सिनेमात श्रिया मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. हा सिनेमा हिंदी, तेलुगु आणि तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं तेलुगु नाव असेल 'अरण्या' तर तमिळमध्ये असेल 'कादन'... राणा दग्गुबतीसोबत या सिनेमात पुलकीत सम्राटही महत्त्वाची भूमिका निभावताना दिसेल.



इतकंच नाही तर श्रियानं 'द पेन्टेड सिग्नल' आणि 'ड्रेसवाला' या दोन शॉर्टफिल्म्स आणि 'पंचगव्य' या डॉक्युमेन्ट्रीचं दिग्दर्शनही केलं आहे. नुकताच श्रिया हिला 'झी युवा तेजस्वी सन्माना'नं गौरवण्यात आलं होतं.