ऐश्वर्या रायच्या 'या' सवयीवर श्वेता बच्चन नाराज, स्वत: केला खुलासा

Shweta Bachchan: श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. अशातच श्वेताने ऐश्वर्याची कोणती गोष्ट तिला आवडत नाही याबद्दल सांगितले आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 13, 2025, 02:28 PM IST
ऐश्वर्या रायच्या 'या' सवयीवर श्वेता बच्चन नाराज, स्वत: केला खुलासा

Shweta Bachchan : अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. कारण, अलीकडेच त्यांच्या मुलीने पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करत ग्लॅमरस जगतात आपलं डेब्यू केलं. या कार्यक्रमाचा व्हिडिओ स्वतः श्वेताने सोशल मीडियावर शेअर केला पण त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली वहिनी ऐश्वर्या राय बच्चन हिला टॅग केलं नाही. याच कारणामुळे नेटकऱ्यांनी श्वेताला चांगलंच ट्रोल केलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

ही पहिलीच वेळ नाही आहे की ऐश्वर्या राय आणि श्वेता बच्चन यांच्यात दुरावा किंवा अनबन दिसून आली आहे. काही काळापूर्वी श्वेतानेच एका प्रसिद्ध शोमध्ये ऐश्वर्या राय बद्दल काही विधानं केली होती जी पुन्हा चर्चेत आली आहेत.

 ‘कॉफी विथ करण’मध्ये खुलासा

करण जोहरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’मध्ये श्वेता बच्चन आपला भाऊ अभिषेक बच्चनसोबत आली होती. शोदरम्यान करणने श्वेताला विचारलं होतं की, 'तुला तुझ्या वहिनीबद्दल म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चनबद्दल काय आवडतं, काय सहन करत नाहीस आणि काय अगदीच नकोसं वाटतं?' त्यावर श्वेताने सांगितलं, 'मला ऐश्वर्या आवडते कारण ती सेल्फ-मेड, खंबीर स्त्री आहे आणि एक अतिशय चांगली आई आहे.'

मात्र, पुढे श्वेताने थोडं मजेशीर पण स्पष्ट उत्तर दिलं, 'ती वेळेचं व्यवस्थापन चांगलं करते पण ती फोन कॉल्स आणि मेसेजेसला उत्तर द्यायला खूप उशीर करते. हे मला अजिबात आवडत नाही' असं म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस फोटो प्रकरण

अमिताभ बच्चन यांनी नुकताच आपला 81वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी संपूर्ण बच्चन परिवार एका ठिकाणी आले होते. श्वेताने वाढदिवसाचा एक फोटो शेअर केला ज्यात नव्या नवेली, अगस्त्य, आराध्या आणि जया बच्चन दिसत होते.

पण नंतर ऐश्वर्याने जेव्हा हा फोटो आपल्या अकाउंटवर टाकला तेव्हा त्यांनी सर्वांना क्रॉप करून फक्त आराध्या आणि अमिताभ बच्चन यांचाच फोटो शेअर केला. या फोटोत आराध्या आपल्या आजोबांना मिठी मारताना दिसत होती. या छोट्या गोष्टीवरून पुन्हा एकदा लोकांनी ऐश्वर्या आणि श्वेतामधील नात्याबद्दल चर्चा सुरू केली. काहींनी म्हटलं की दोघींचं समीकरण थोडं ‘फ्रॉस्टी’ आहे. तर काहींनी ते फक्त सोशल मीडियाचं ‘ओव्हरअॅनालिसिस’ असल्याचं सांगितलं.

FAQ

श्वेता बच्चन सध्या का चर्चेत आहेत?

श्वेता बच्चन पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करून ग्लॅमरस डेब्यू केले. त्यांच्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चनला टॅग न केल्याने ट्रोलिंग सुरू झाली.

श्वेता बच्चनचा पॅरिस फॅशन वीक डेब्यू कसा?

श्वेताने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला, ज्यात ती रॅम्प वॉक करत दिसते. चाहते तिच्या लुकचे कौतुक करत आहेत, पण ऐश्वर्यला टॅग न केल्याने वाद रंगला.

‘कॉफी विथ करण’ मध्ये श्वेताने ऐश्वर्यबद्दल काय म्हटले?

करण जोहरने विचारले, ‘ऐश्वर्यबद्दल काय आवडते, सहन करत नाहीस?’ श्वेताने म्हटले, ‘ती सेल्फ-मेड, खंबीर स्त्री आणि चांगली आई आहे. पण फोन कॉल्स आणि मेसेजेसला उत्तर द्यायला उशीर करते, हे आवडत नाही.’

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More