मुंबई : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान यांचा मुलगा इब्राहिम खान आणि टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा मध्यंतरी समोर आल्या होत्या. मात्र पलक तिवारी इब्राहिम नाही तर या अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री पलक तिवारी इब्राहिमला नाही तर आर्चीज फेम वेदांग रायनाला डेट करत आहे.पलक तिवारी वेदांग रायनासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे ऐकून तुम्हाला धक्काचं बसला असेल. आता हे अफेअर कधी आणि कसे सुरू झाले हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 


दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करतायत 


वेदांग आणि पलक एकाच टॅलेंट कंपनीशी संबंधित आहेत. या टॅलेंट कंपनीच्या एका खासगी पार्टीत पलक आणि वेदांगची भेट झाली. पहिल्याच भेटीत दोघांची चांगली मैत्री झाली, त्यानंतर दोघेही प्रायव्हेट पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. दोघेही दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत, पण मीडियाला याचा सुगावाही लागला नव्हता. 


श्वेता तिवारी काय म्हणाली?
पलक आणि वेदांगच्या नात्याबद्दल श्वेता तिवारी म्हणाली, 'या दोघांचे व्यावसायिक करिअर नुकतेच सुरू झाले आहे हे उघड आहे. त्यामुळे या नात्याबद्दल इतक्या लवकर बोलणे योग्य ठरणार नाही. पलक ज्याचीही निवड करेल, त्याचा मला आनंद असेल.


रिलेशनशिपची अफवा 
पलकच्या टीमने हे दोघेही कपल असल्याचं नाकारलं आहे. 'ही फक्त अफवा आहे' असल्याचं टीमने म्हटले आहे. 


पलकने हार्डी संधूच्या 'बिजली बिजली' या गाण्यामध्ये दिसली होती. तसेच लवकरच ही अभिनेत्री अरबाज खान आणि तनिषा मुखर्जीसोबत रोझी: द केफ्रॉन चॅप्टर या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. त्याचवेळी वेदांग झोया अख्तरच्या आर्चीज या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे.