Kailash Kher Attacked: प्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. कैलाश खेर कर्नाटकमधील हम्पी महोत्सवात सहभागी झाले होते. मंचावर गाणं गात प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतानाच दोन तरुणांनी त्यांच्या दिशेने बाटली फेकत हल्ला केला. यानंतर काही काळासाठी कार्यक्रम थांबवण्यात आला. जाणून घ्या नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकमध्ये तीन दिवसांच्या हम्पी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव रविवारी 29 जानेवारीपर्यंत सुरु होता. या महोत्सवात अनेक गायक सहभागी झाले होते, ज्यामध्ये कैलाश खेरदेखील होते. 


दोन तरुणांनी फेकली बाटली


मिळालेल्या माहितीनुसार, कैलाश खेर मंचावरुन गाणं गात प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते. यावेळी दोन तरुणांनी कन्नड गाणं गाण्याची मागणी केली. याचवेळी त्यांनी कैलाश खेर यांच्या दिशेने पाण्याची बाटली फेकली. रविवारी ही घटना घडली. बाटली फेकल्यानंतर काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं. 



तीन दिवसांचा हा हम्पी महोत्सव 27 जानेवारीला सुरु झाला होता. 29 जानेवारीला महोत्सवाचा समारोप झाला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या महोत्सवाचं उद्धाटन केलं होतं. या महोत्सवात अनेक बॉलिवूड आणि कन्नड गायक सहभागी झाले होते.