'सितारे जमीन पर'सारखाच आहे 'हा' हॉलिवूड चित्रपट; तुम्ही पाहिलात का?

Sitaare Zameen Par : आमिर खानचा 'सितारे झमीन पर' हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक? 'तो' कोणता चित्रपट आहे त्याविषयी जाणून घेऊया...

दिक्षा पाटील | Updated: May 14, 2025, 02:25 PM IST
'सितारे जमीन पर'सारखाच आहे 'हा' हॉलिवूड चित्रपट; तुम्ही पाहिलात का?
(Photo Credit : Social Media)

Sitaare Zameen Par : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'सितारे जमीन पर' या चित्रपटाटा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या आमिर खानच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. खरंतर, या चित्रपटाला घेऊन बराच काळ चर्चा सुरु होती. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधलं असून सगळ्यांच्या पसंतीस देखील उतरला आहे. पण ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर इंटरनेटवर दुसरी चर्चा रंगली आहे. चाहत्यांना हे प्रचंड आवडलं आहे की एक वेगळी आणि हटके कथा आहे. फक्त एक गोष्ट जी आधीच्या चित्रपटातील या चित्रपटात दिसली म्हणजे आमिर खान हा शिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. पण यावेळी तो वर्गात शिकवणार नसून एक बास्केट बॉल कोचच्या रुपात दिसणार आहे. यावेळी तो स्वमग्न मुलांना ट्रेनिंग देतोय. दरम्यान, अनेकांचं म्हणणं आहे ही पटकथा ओरिजनल असेल पण ते खरं नाही. आमिरचा हा चित्रपट एका हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या चित्रपटात आमिर खान हा सगळ्यांचं लक्ष वेधणार नाही तर ती मुलं आहेत. पण हा ट्रेलर पाहुन अनेकांच्या हे लक्षात आलं की हा चित्रपट एका परदेशातील चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट एक स्पॅनिश भाषेत असलेल्या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचं नाव चॅम्पियन होतं. त्यानंतर 2013 मध्ये याच नावानं इंग्रजी भाषेत चित्रपट प्रदर्शित झाला. जर तुम्ही चॅम्पियन पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की आमिर खाननं चित्रपटाची आयडिया तिथूनच घेतली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aamir Khan Productions (@aamirkhanproductions)

दरम्यान, आमिर खाननं भारत-पाकिस्तानमध्ये वाढते तनाव पाहता या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च पोस्टपोन केला होता. तर 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा सीक्वल आहे. हा चित्रपट 20 जून रोजी प्रदर्शित झाला. नुकतीच बातमी समोर आली की आमिरचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 8 आठवड्यात युट्यूबवर PPV अर्थात पे-पर-व्यू मॉडलवर लॉन्च करणार आहे. अशा प्रकारे प्रेक्षक घर बसल्या हा चित्रपट कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय पाहू शकणार आहेत. तर त्यांना अशा प्रकारेच तिकिट खरेदी करावं लागेल जसं थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यासाठी जातो.  

चित्रपटात आमिर खानसोबत जिनिलिया देशमुख दिसत आहे. तर या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना लॉन्च करण्यात येत आहे. त्यात अरुषा दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साली, आशीष पेंडसे, ऋषी साहनी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर ही नावं आहेत.