Danny Pandit Apologizes: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडीत हा आपल्या वेगळ्या कंटेटमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तो मनोरंजनासह अनेक सामाजिक विषय देखील हाताळत असतो. दरम्यान डॅनी पंडीतने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत माफी मागितली आहे. गणेशोत्सव काळात अथर्व सुदामेने सर्वांची माफी मागत व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनंतर त्याच्या सपोर्टसाठी अनेकांनी व्हिडीओ बनवले होते. दरम्यान आता डॅनी पंडीतने कोणाची माफी मागितलीय? सविस्तर जाणून घेऊया.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडितचं खरं नाव मुकेश पंडित असं आहे. त्याच्या कंटेटमुळे तो आता लाखो तरुणांच्या मनात घर करून बसलाय. २०१६ मध्ये यूट्यूब चॅनेल सुरू करून हास्यपूर्ण व्हिडिओ आणि ट्रॅव्हल व्लॉग्स अपलोड करणाऱ्या डॅनीने अवघ्या काही वर्षांत इन्स्टाग्रामवर १७ लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. त्यांचे कंटेंट मुख्यतः हिंदी आणि मराठी भाषेत असते, ज्यात दैनंदिन जीवनातील ट्रेंड्स, नातेसंबंध, परीक्षा निकाल आणि सांस्कृतिक पैलूंचा हास्यपूर्ण आढावा घेतला जातो. 'नॉर्मल डे विथ डॅनी पंडित' हे त्याचे लोकप्रिय फॉरमॅट आहे, ज्यात विविध वयोगट आणि पार्श्वभूमीतील व्यक्तींच्या स्टिरियोटायपिकल पोर्ट्रेट्सद्वारे प्रेक्षकांना हसवले जाते.
२०२४ मध्ये फोर्ब्सच्या डिजिटल स्टार्स लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचलेल्या डॅनीचे एंगेजमेंट रेट १८.९४% आहे, जे त्यांच्या कंटेंटच्या यशाचे प्रमाणपत्र आहे. त्यांनी 'बाधशा बॉय' नावाचा मराठी रॅप सॉंग लाँच केला, जो त्यांनी स्वतः लिहिला आणि गायला. तसेच, 'नॉर्मल डे विथ डॅनी पंडित' नावाने लाइव्ह कॉमेडी शो सुरू केला, ज्यात स्केच प्लेजद्वारे प्रेक्षकांशी थेट जोडले जाते. ऑगस्ट २०२५ मध्ये गणेशोत्सवावेळी त्यांनी हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा रील शेअर केला, ज्यात गणेश आरतीदरम्यान मुस्लिम महिलेच्या मदकांच्या योगदानाची सुंदर कथा दाखवली. हा व्हिडिओ अथर्व सुदामे यांच्या वादग्रस्त रीलला अप्रत्यक्ष पाठिंबा देणारा ठरला आणि सोशल हार्मनीचे प्रतीक बनला.
फेसबुकवर १८० हजार लाइक्स असलेल्या डॅनीचे कंटेंट मराठी जीवनशैली, खाद्यसंस्कृती आणि संबंधांवर आधारित असते. मात्र, काही व्हिडिओंमुळे जातीय पूर्वग्रहांच्या आरोपांनाही सामोरे जावे लागले. तरीही, त्यांचे हास्य आणि सकारात्मक संदेश प्रेक्षकांना आनंद देतात. डॅनी पंडित हे डिजिटल युगातील एक उत्तम उदाहरण आहेत, जे एंटरटेनमेंटद्वारे सामाजिक जागृती घडवतात.
'मला कॉल करुन धमक्या.., डॅनी पंडीतने हात जोडून मागितली माफी..' माझ्या आईला दोघांनी घेरलं आणि..'#DannyPandit pic.twitter.com/t11XEMqC2F
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 9, 2025
'नमस्कार मी डॅनी पंडीत. खरंतर अशा स्टोरीस मी पोस्ट करत नाही. कधीच करत नाही. पण सध्याची परिस्थिती, सध्याचं वातावरण खूपच टॉक्सिक झालंय. गेली अनेक दिवस लोकं मला डीएम करतायत. कॉल करुन धमक्या देतायत. कोणीतरी माझा नंबर लीक केलाय. मी स्टोरी बनवलीपण नसती. पण काल खूपच झालं. माझी आई कोणत्या तरी कामासाठी गेली होती. आणि 2 मुलं आली आणि तिला घेरलं. डॅनीचा पुण्यात शो का नाही होतं? असं त्यांनी तिला विचारलं. म्हणजे हे आता इतकं झालंय. आपल्याला डेट्स नव्हत्या मिळत. पुढच्या स्टोरीमध्ये मी शोची लिंक दिली आहे. 26 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता आपला शो 'नॉर्मल डे विथ डॅनी पंडीत' होतोय. त्यावर क्लिक करुन तुम्ही शोचे बुकींग करु शकता. आणि बंद करा हे', असंही तो मिश्किलपणे पुढे म्हणाला.
डॅनी पंडीतने आपल्या खास शैलीत 'नॉर्मल डे विथ डॅनी पंडीत' कार्यक्रमाचे प्रमोशन केलंय. तसेच पुण्यातील कार्यक्रमाची माहिती यातून दिलीय. पुढे त्याने बुकींगची लिंकदेखील दिलीय. स्टोरी शेअर केल्याने ही पोस्ट आणि लिंक 24तासचं दिसेल याची नोंद घ्या.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.