उर्फी जावेदचा पोल डान्स करताना गेला तोल! Video पाहून चाहते थक्क

उर्फी जावेदचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पोल डान्स करत आहे. या दरम्यान तिचा तोल गेल्याने ती जमीनीवर पडली. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 23, 2025, 01:11 PM IST
उर्फी जावेदचा पोल डान्स करताना गेला तोल! Video पाहून चाहते थक्क

Urfi Javed Pole Dance Video : उर्फी जावेद तिच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी आणि स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नेहमी ती तिचे हटके व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांना इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकताच उर्फीने तिचा पोल डान्स करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा तोल गेल्याचे दिसत आहे. यादरम्यान तिची ट्रेनर येते आणि तिला वाचवते.

Add Zee News as a Preferred Source

व्हायरल व्हिडीओमध्ये उर्फी पोल डान्स करताना दिसत आहे. यावेळी उर्फीने स्पोर्ट्स ब्रा आणि जांभळ्या रंगाची शॉर्ट परिधान करून पोल डान्स करण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिचा ट्रेनर तिला यात मदत करत आहे, पण अचानक उर्फीचा तोल जातो आणि ती खाली पडते. मात्र, तिची ट्रेनर तात्काळ तिची काळजी घेते, त्यामुळे ती एका मोठ्या अपघातापासून वाचते.

उर्फी जावेदच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.  काही लोक तर तिच्या या पोल डान्सचे कौतुक करत आहेत. ज्यामध्ये तिने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत आहेत. मात्र, अनेक चाहते तिच्या या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

उर्फी जावेद वर्क फ्रंट

सध्या उर्फी जावेद अनेक टीव्ही शोमध्ये दिसत आहे. उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दर्गा, बडे भैया की दुल्हनिया यांसारख्या टीव्ही शो मध्ये दिसत आहे. पण उर्फी जावेदला बिग बॉसमधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. याच शोमधून ती रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. यानंतर उर्फीच्या हटके लूकने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिलीये. नुकतीच उर्फी जावेदची वेब सीरिज रिलीज झाली, ज्याचे नाव 'फॉलो कर लो यार' आहे. हा सीरिज OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओजवर रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये उर्फीच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूची ओळख करून देण्यात आली आहे. या सीरिजला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More