बांदेकरांच्या घरात शुभ विवाह! सोहम-पूजा लग्नबंधनात अडकले, पाहा खास क्षण

Soham Bandekar and Pooja Birari Wedding : सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचा विवाह सोहळा अलिबागमध्ये संपन्न झाला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 2, 2025, 06:54 PM IST
बांदेकरांच्या घरात शुभ विवाह! सोहम-पूजा लग्नबंधनात अडकले, पाहा खास क्षण

Soham Bandekar and Pooja Birari Wedding : मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट अवेटेड वेडिंग संपन्न झाला आहे. महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा बोहल्यावर चढला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सोहम बांदेकरने लोणावळ्यात अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्न केलं आहे. पूजा आणि सोहमच्या लग्नाची खूप दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर हा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. पूजा-सोहमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 

पूजा आणि सोहमच्या लग्नाच्या लूकची देखील चर्चा होत आहे. पूजाने यावेळी गुलाबी रंगाची साडी नेसली होती तर पिवळ्या रंगाची शाल घेतली होती. सोहमने पूजाला मॅच करत बेबी पिंक रंगाचा डिझाइनर कुर्ता घातला आहे. मिस्टर अँड मिसेस बांदेकर म्हणत सगळीकडे त्यांचीच चर्चा आहे. 

पूजा आणि सोहमचं लग्न लोणावळ्यात संपन्न झालं. सर्वत्र फुलांची सजावट आणि लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. यावेळी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी खास डान्स देखील केली. 

पूजा आणि सोहम यांच्या हळदी समारंभाला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेता अभिजीत केळकर आणि अभिनेत्री सानिका बनारसवाले यांसारखे लोकप्रिय कलाकार हळदीला पोहोचले होते. सोशल मीडियावर या समारंभाचे काही धमाल व्हिडिओ समोर आले आहेत. सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More