अलीकडेच सोनाक्षी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. या मुलाखतीत तिनं तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल, सासरच्या कुटुंबाशी असलेल्या जवळिकीबद्दल आणि झहीरसोबतच्या नात्यातील गोड क्षणांबद्दल मोकळेपणानं बोलली.
सोनाक्षीनं खुलासा केला की, लग्नाआधी झहीर इक्बालनं तिला विचारलं होतं 'तुला माझ्या कुटुंबासोबत रहायचं आहे की लग्नानंतर आपण वेगळं राहू?' या प्रश्नावर सोनाक्षीनं तत्काळ उत्तर दिलं, 'मला कुटुंबासोबतच राहायचं आहे. तुला हवं असल्यास तू एकटा राहू शकतोस.' तिचं उत्तर ऐकून झहीर आणि त्याचे आई-वडील दोघेही हसले आणि त्या क्षणाने दोघांच्या कुटुंबांमध्ये जवळीक निर्माण झाली.
सोनाक्षीनं पुढे सांगितलं की तिच्या सासरच्या लोकांशी तिचं नातं अतिशय प्रेमळ आणि सहज आहे. 'माझं सासरचं कुटुंब खूप आपुलकीनं वागणारं आहे. आम्ही सगळे मिळून राहतो, खूप मजा करतो. केवळ एकत्र राहणं नाही, तर आम्ही एकत्र सुट्ट्यांवरही जातो आणि ते क्षण अविस्मरणीय असतात,' असं ती म्हणाली.
मुलाखतीदरम्यान सोनाक्षीनं एक गंमतीशीर किस्सा सांगितला. 'मला अजूनही स्वयंपाक करता येत नाही आणि गंमत म्हणजे माझ्या सासूबाईंनाही नाही. त्यामुळे आम्ही दोघीही एकमेकींकडे पाहून हसतो. कधी कधी सगळे आम्हाला ‘कोण स्वयंपाक करणार?’ म्हणून चिडवतात,' असं हसत-हसत ती म्हणाली.
सोनाक्षीनं पुढे तिच्या आई पूनम सिन्हा यांच्याबद्दल सांगितलं 'आई खूपच चांगला स्वयंपाक करते. पण जेव्हा एखादं डिश चांगलं होत नाही, तेव्हा ती लगेच काळजी करते आणि म्हणते की माझ्या मुलीला तरी काहीतरी शिकवलं पाहिजे होतं.'
सोनाक्षी आणि झहीर लग्नाआधी जवळपास सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही त्यांचं नातं खूप काळ गुप्त ठेवलं होतं. जेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी त्यांच्या धर्म आणि कुटुंब पार्श्वभूमीवरून टीका केली होती. मात्र, दोघांनीही रजिस्टर मॅरेज करून त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात केली.
सोनाक्षीनं सांगितलं की, 'झहीर आणि मी दोघंही एकमेकांबद्दल खूप समजूतदार आहोत. आमचं नातं परस्पर आदर आणि विश्वासावर आधारलेलं आहे. आम्ही दोघे फक्त पती-पत्नी नाही, तर एकमेकांचे सर्वात चांगले मित्र आहोत.'
सोनाक्षीनं मुलाखतीच्या शेवटी असं सांगितलं की, 'माझ्या सासरचं कुटुंब खूप प्रेमळ आहे. मला कधीच वाटलं नाही की मी नव्या घरात आहे. ते माझ्या आई-वडिलांसारखेच आहेत.' सोनाक्षी आणि झहीर इक्बालचं हे गोड नातं आणि त्यांच्या सासरच्या घरातील आत्मीय संबंध पाहून नेटिझन्सनाही त्यांचं कौतुक वाटत आहे. लग्नानंतर सोनाक्षीचा हा प्रामाणिक आणि आपुलकीचा स्वभाव पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या मनात घर करत आहे.
FAQ
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचं लग्न कधी झालं?
जून २०२४ मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी साध्या पण सुंदर पद्धतीने रजिस्टर मॅरेज केलं.
सोनाक्षी सासरच्या कुटुंबासोबत राहते का?
हो, सोनाक्षीने स्वतः सांगितलं आहे की तिला एकत्र कुटुंबासोबत राहणं आवडतं आणि ती सासरच्यांशी अतिशय जवळची आहे.
लग्नानंतर सोनाक्षीच्या आयुष्यात काय बदल झाले?
सोनाक्षीनं सांगितलं की लग्नानंतर तिच्या आयुष्यात फक्त प्रेम, समजूतदारपणा आणि आनंद वाढला आहे काहीही नकारात्मक बदल झालेला नाही.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.