Sonu Sood Wife Accident in Nagpur: अभिनेता सोनू सूदची पत्नी, सोनाली सूद हिच्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी हायवेवर एका रस्ते अपघातात सोनाली सूद जखमी झाली आहे.
सूत्रानुसार, सोनाली तिच्या बहिणी आणि पुतण्यासोबत प्रवास करत होती. चालक गाडी चालवत असून तो देखील अपघातात जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा (24 मार्च) घडली आणि सोनाली आणि तिचा पुतण्या दोघेही सध्या नागपूरमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सोनू सूद नागपूरला रवाना झाला आहे. आणि काल रात्रीपासून तो नागपूरमध्ये आहे, असे सूत्रांनी सांगितले. अभिनेत्याच्या प्रवक्त्यानेही या वृत्ताला दुजोरा देत म्हटले आहे की, "हो, सोनालीचा अपघात झाला आहे. सोनू सध्या उपलब्ध नाही."
रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सोनाली आणि तिचा पुतण्या निरीक्षणाखाली आहेत आणि पुढील 48-72 तास त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल. सोनालीच्या बहिणीबद्दल बोलायचे झाले तर, ती पूर्णपणे सुरक्षित राहिली, तिला फक्त किरकोळ दुखापत झाली.
संपूर्ण माहिती थोड्या वेळात...