दाक्षिणात्या ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन. सिनेसृष्टीवर शोककळा.

Kota Srinivasa Rao Passes Away : साउथ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे आज सकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर केवळ खलनायकच नव्हे तर विनोदी, चरित्र आणि राजकीय भूमिका देखील जिवंत केल्या.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ते अल्पशा आजाराने त्रस्त होते आणि काही काळापासून हैदराबादमधील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांची प्रकृती पाहून त्यांचे चाहते देखील खूप चिंतेत पडले होत. फोटोमध्ये अभिनेत्याच्या पायावर पट्टी बांधलेली होती तर दुसऱ्या पायावर देखील जखमांच्या खुणा होत्या. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि कुटुंबीय असा परिवार आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून कोटी श्रीनावस राव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वीच कोटी श्रीनावस राव यांनी त्यांचा 83 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. त्याच वेळी त्यांची प्रकृती पाहून चाहते चिंतेत पडले होते.
700 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये केलं काम
अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांनी आपला करिअर सुरुवात तेलुगू रंगभूमीवरून केली. त्यानंतर त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम हिंदी या भाषांमध्ये सुमारे 700 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेषतः त्यांची खलनायकी भूमिका ही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून बसली.
त्यांचा अभिनय नैसर्गिक, जिवंत आणि तितकाच प्रभावी होता. त्यांच्या अनेक भूमिका असो वा राजकीय दबदबा असलेला नेता कोटा यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला आपली खास छाप दिली. त्यांच्या अनेक भूमिका आजही तेलुगू चित्रपट रसिक विसरलेले नाहीत. अभिनयाबरोबरच ते एक माजी आमदार देखील होते. त्यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवला होता.