मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतात गाजलेला आणि आता हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेता नागा चैतन्य यानं गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आगामी चित्रपट हे त्यामागचं कारण नसून, समंथा रुथ प्रभू हिच्याशी झालेल्या घटस्फोटामुळं तो चर्चेत आला आहे. (South indian Actor Naga chaitanya angry reatcion on Divorce with Ex Wife samantha ruth prabhu )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यानही नागा चैतन्यला समंथासोबतच्या नात्याविषयीचे प्रश्न विचारले जात आहेत. एका मर्यादेपर्यंत तो या सर्व प्रश्नांची उत्तरंही देत आहे. पण, सहनशीलतेची परिसीमा ओलांडल्यानंतर मात्र नागा चैतन्य अजिबात शांत बसताना दिसत नाहीये. 


हल्लीच एका मुलाखतीमध्ये त्याला असाच एक प्रश्न विचारला गेला. तुला काम आणि खासगी आयुष्यात समतोल राखता आलाय का? हाच तो प्रश्न. या प्रश्नाच उत्तर देत नागा चैतन्य असं काही म्हणाला की, त्याला पुन्हा असे प्रश्न कोणीच विचारणार नाही. 


काय म्हणाला नागा चैतन्य? 
'आम्ही जाहीरपणे आपापली मतं मांडली. आम्ही एकमेकांचा प्रचंड आदर करतो. पण, आता मात्र हे सर्वजण (माध्यमं) रकाने भरण्याचा प्रयत्न करत आहेत बाकी काहीच नाही. पुरे आता... मला या साऱ्याचा वीट आलाय. दरम्यानच्या काळात माझे तीन चित्रपट प्रदर्शित झाले पण अद्यापही या विषयानं (घटस्फोटानं) मात्र माझा पाठलाग सोडलेला नाही', असं तो म्हणाला. 


समंथा आणि नागा चैतन्यनं मागील वर्षी त्यांच्या 4 वर्षांच्या वैवाहित नात्याला पूर्णविराम लावला. मैत्री, प्रेम आणि त्यानंतर वैवाहिक आयुष्य पाहता समंथा- नागा चैतन्यचा हा निर्णय चाहत्यांना जबर धक्का देऊन गेला. आज त्यांच्या या निर्णयाला बरेच दिवस उलटले असले तरीही या नात्यानं त्यांचा पाठलाग सोडलेला नाही असंच म्हणावं लागेल.