गरोदर असताना श्रीदेवींनी केलं 'जुदाई'चं शूट; तो किस्सा सांगत उर्मिला मातोंडकर म्हणाली...

सध्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 'डीआयडी सुपर मॉम्स' या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे.

Updated: Aug 6, 2022, 09:01 PM IST
गरोदर असताना श्रीदेवींनी केलं 'जुदाई'चं शूट; तो किस्सा सांगत उर्मिला  मातोंडकर म्हणाली... title=

मुंबई : सध्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 'डीआयडी सुपर मॉम्स' या टीव्ही रिएलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. जिथे जान्हवी कपूर पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. याच शोमध्ये जान्हवी कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना उर्मिला मातोंडकरने श्रीदेवी यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे.

जान्हवी कपूरसोबतचं खास नातं सांगितलं
खरंतर, 'डीआयडी सुपर मॉम्स' च्या मंचावर एका स्पर्धकाचा डान्स पाहून उर्मिला खूप आनंदी होते आणि हा डान्स पाहून आईला साथ देणाऱ्या तिच्या तिच्या मुलीचंही कौतुक करते. त्याचवेळी उर्मिलाला दिवंगत अभिनेत्री आणि जान्हवी कपूरची आई श्रीदेवीची आठवण येते आणि ती म्हणते की जान्हवीशी माझं खूप जुनं आणि खास नातं आहे. आणि ती आईच्या पोटात असल्यापासून आहे.

जुदाई चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी गरोदर होती
स्पर्धकाचा डान्स पाहून उर्मिलाने सांगितलं की, 'जुदाई'च्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी गर्भवती होती आणि तिच्या पोटात जान्हवी कपूर होती. मात्र, श्रीदेवीमुळे त्या गाण्याचं शूटिंग व्यवस्थित पूर्ण झाले. तेव्हापासून जान्हवीशी माझं खास नातं आहे.

श्रीदेवीने 1996 मध्ये चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर या दोघंही जान्हवी कपूर आणि खुशी कपूरचे पालक झाले. 2018 मध्ये श्रीदेवी यांचं निधन झालं.