मुंबई :कलाकारांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी चॅनेलकडून  वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन केलं जातं. नुकतचं 'स्टार प्रवाह'वाहिनीने खास पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहामध्ये नुकताच हा रंगारंग सोहळा पार पडला. 



स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरचा कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा होता.



स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये दररोज प्रेक्षक भेटतात. पण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा लूक करत सगळ्यांचं लक्ष वेधलं.


3 एप्रिलला हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.