मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरूख (Shahruh Khan)आपल्या मुलांबाबत खूप प्रोटेक्टिव आहे. प्रत्येक वडिलांप्रमाणे तो आपल्या मुलांची खूप काळजी घेतो. शाहरूख खान मुलगी सुहाना (Suhana Khan)ची जास्त काळजी घेतो. आणि तो अनेकदा तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत असतो. एका मुलाखतीत शाहरूखने सुहानाच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये शाहरूख खानला प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा की,'जर तुझ्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने किस केलं तर तू काय करशील?'


तेव्हा शाहरूख खानने उत्तर दिलं की,'माझ्या मुलीला डेट करण्यापूर्वी तो मुलगा हजारवेळा विचार करेल. आणि घाबरेल ही.' तसेच उत्तर देताना शाहरूख खान म्हणाला की,'मी त्या मुलाचे ओढ चिरून टाकेन.' यानंतर शाहरूख आणि करण जोहर खूप हसू लागले. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by  (@srkian.aman)


मुलांबाबत सुहानाला दिलेत हे सल्ले 


एका मुलाखतीत शहारूखला विचारण्यात आलं होतं, जर राहुल या तुमच्या कॅरेक्टरप्रमाणे मुलगा सुहानाला मिळाला तर काय प्रतिक्रिया असेल. तेव्हा शाहरूखने आपल्याला ते आवडणार नाही, असं सांगितलं होतं. शाहरूख खानने आपल्या मुलीला अनेक सल्ले दिले आहेत. यामध्ये त्याच्या सिनेमातील कॅरेक्टरचं उदाहरण त्याने दिलं आहे.